Join us

क्रांती रेडकरने गायलं "कुछ कुछ होता है" गाण्याचं मालवणी व्हर्जन, व्हिडीओ पाहून पोट धरुन हसाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 15:55 IST

'कुछ कुछ होता है' गाण्याने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. आता या गाण्याचं मालवणी व्हर्जन अभिनेत्री क्रांती रेडकरने तयार केलं आहे. 

'कुछ कुछ होता है' हा बॉलिवूडमधील एव्हरग्रीन सिनेमा आहे. १९९८ साली हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात राहुल, अंजली आणि टीना यांचं लव्ह ट्रँगल दाखवण्यात आलं होतं. शाहरुख खान, राणी मुखर्जी आणि काजोल सिनेमात मुख्य भूमिकेत होते. या सिनेमातील गाणीही प्रचंड लोकप्रिय ठरली होती. 'कुछ कुछ होता है' गाण्याने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. आता या गाण्याचं मालवणी व्हर्जन अभिनेत्री क्रांती रेडकरने तयार केलं आहे. 

क्रांती रेडकर ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. क्रांती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. अनेक रील व्हिडिओ क्रांतीने शेअर करत असते. यामधून ती तिच्या जुळ्या मुलींचे किस्सेही सांगते. आता क्रांतीने तिच्या बहिणीसोबत रील बनवला आहे. या व्हिडिओत क्रांती तिच्या बहिणीसोबत 'कुछ कुछ होता है' गाण्याचं मालवणी व्हर्जन गाताना दिसत आहे. क्रांती व्हिडिओत म्हणते, "तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी मालवणी रीलसाठी रिक्वेस्ट केली होती. लहानपणापासून आम्ही बहिणी हिंदी गाण्यांची मालवणी गाणी बनवून गातो. तर 'कुछ कुछ होता है'चं मालवणी व्हर्जन सादर करत आहोत". 

"तू जवळ इलं, असो काय तो हसलोस...तूच मेल्या नसती नसती, सपनं दाखवलंस...आता तर माझा मन, निजना नाय जागता हाय... काय सांगू मेल्या, कसा कसा जागता हाय", असं गाण्याचं मालवणी व्हर्जन क्रांती आणि तिच्या बहिणीने गायलं आहे. क्रांतीच्या हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. 

टॅग्स :क्रांती रेडकरसेलिब्रिटी