Join us

'खंडेराया झाली माझी दैना' हे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 13:38 IST

'खंडेराया झाली माझी दैना' हे रोमँटिक गाणे असून हे गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देवैभव लोंढे यांच्या आवाजात सजले 'खंडेराया झाली माझी दैना' गाणे

सध्या मराठी चित्रपटसृष्टीत नवनवीन अल्बम रसिकांच्या भेटीला येत आहेत. त्यात आता आणखीन एक नवीन गाणे दाखल झाले आहे. या गाण्याचे बोल 'खंडेराया झाली माझी दैना' असे आहेत. हे रोमँटिक गाणे असून हे गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. 

गीतकार, गायक वैभव लोंढे यांच्या आवाजात 'खंडेराया झाली माझी दैना' हे गाणे सजले आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुती असलेल्या या गाण्याची निर्मिती चेतन गरुड प्रॉडक्शनने केली आहे. या गाण्याच्या व्हिडिओमध्ये गाण्याच्या भाषेला साजेसा असा एक माहौल निर्माण केला गेला आहे. या गाण्यात एक तरूण आपल्याला आवडणाऱ्या मुलीला प्रपोझ करण्यासाठी त्याची सुरू असलेली घालमेल पाहायला मिळते आहे. शेवटी तो तिला मनवतो असे या गाण्यात दाखवले आहे. 

ट्रेडीशनल गाण्याला रोमँटिक टच देऊन एक नवे व्हर्जन सादर करण्याचा प्रयत्न संगीत दिग्दर्शकाने केला आहे. वैभव लोंढे यांनी या गाण्याचे बोल लिहिले असून संगीत दिग्दर्शनही त्यांनीच केले आहे. साईशा पाठक व वैभव लोंढे यांच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या या गाण्याचे दिग्दर्शन तेजस पाटील यांनी केले आहे. रवी उछे यांनी गाण्याचे छायाचित्रण केले आहे तर रोहन माने यांनी नृत्यदिग्दर्शन केले आहे. वेगळ्या बाजातील 'खंडेराया झाली माझी दैना' हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते का हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.