Join us
Daily Top 2Weekly Top 5

​कट्यारला... १०० दिवस पुर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2016 03:34 IST

         कट्यार काळजात घुसली या सिनेमाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रदर्शनापुर्वीच खुप उत्सुकता आणि उत्कंठा पहायला मिळत होती. चित्रपट ...

         कट्यार काळजात घुसली या सिनेमाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रदर्शनापुर्वीच खुप उत्सुकता आणि उत्कंठा पहायला मिळत होती. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी त्याला उदंड प्रतिसाद देऊन अक्षरश: डोक्यावर घेतले. कट्यार मधील दिग्गज कलाकार, त्यांचा अजरामर अभिनय, भव्य-दिव्य सेट्स आणि गाण्यांनी तर रसिकांना भुरळ पाडली. सिनेमागृहांबाहेर हाऊसफुल्लच्या पाट्या झळकविणाºया कट्यार काळजात घुसली या सिनेमाला आज १०० दिवस पुर्ण होत आहेत.        चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी कट्यारच्या यशाबद्दल सर्व कलाकारांचे सोशल मिडीयावर अभिनंदन केले आहे. सुबोध भावेने कट्यार ला शंभर दिवस पुर्ण होत आहेत आणि त्याचे संपुर्ण श्रेय  माझी टिम आणि मायबाप प्रेक्षकांचेच असल्याचे टष्ट्वीटर वरुन सांगितले. कोठारे कुटूंबियांनी देखील याबद्दल कट्यारच्या टिमला शुभेच्छा दिल्या आहेत.