करणनेही केले सैराटचे कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2016 11:53 IST
सैराट या चित्रपटाच्या प्रेमात केवळ मराठी इंडस्ट्रीतील लोक पडलेले नाहीत तर सैराटची जादू हिंदी इंडस्ट्रीमध्येही पसरली आहे. सैराटचे कौतुक ...
करणनेही केले सैराटचे कौतुक
सैराट या चित्रपटाच्या प्रेमात केवळ मराठी इंडस्ट्रीतील लोक पडलेले नाहीत तर सैराटची जादू हिंदी इंडस्ट्रीमध्येही पसरली आहे. सैराटचे कौतुक सध्या सगळेच करत आहे. या चित्रपटाच्या टीमला काही दिवसांपूर्वी द कपिल शर्मा शोमध्येही बोलवण्यात आले होते. या चित्रपटाबद्दल होत असलेली चर्चा पाहाता दिग्दर्शक - निर्माता करण जोहरनेदेखील हा चित्रपट पाहिला. हा चित्रपट त्याला प्रचंड आवडला असल्याचे त्याने ट्वीट केले आहे. त्याने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, मी मी काल रात्री सैराट हा चित्रपट पाहिला. सकाळी उठल्यानंतरही या चित्रपटाची कथा माझ्या डोक्यात घुटमळत आहे. काहीही केल्या माझ्यावर पडलेला या चित्रपटाचा प्रभाव थोडाही कमी होत नाहीये. या चित्रपटाबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर निर्माण झालेला आहे.