Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रेम कहानी’ सिनेमानंतर काजल शर्मा झळकणार 'लव बेटिंग' सिनेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2017 14:42 IST

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करून अनेक कलावंतांनी आपले नशीब आजमावले आहे. यात काजल शर्मा हा नवा ...

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करून अनेक कलावंतांनी आपले नशीब आजमावले आहे. यात काजल शर्मा हा नवा फ्रेश चेहरा मराठी चित्रपटसृष्टीत दाखल झाला आहे. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘प्रेम कहानी’या मराठी सिनेमातून रुपेरी पडद्यावर दुहेरी भूमिकेत पदार्पण करून काजलने आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली होती.आता ‘लव बेटिंग’ या नव्या सिनेमातून ती प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. ‘लव बेटिंग’ हा प्रेमाचे विविध रंग दाखविणारा सिनेमा आहे. यात चिराग पाटील व स्मिता गोंदकर यांच्यात प्रेमासाठी लागलेली अनोखी बेटिंग पहायला मिळणार असून  सिनेमात शांत स्वभावाच्या मुलीची व्यक्तिरेखा साकारतेय. लालचंद शर्मा, सुनिता शर्मा निर्मित ‘लव बेटिंग’ चित्रपटाचे दिग्दर्शन राजू मेश्राम यांनी केले आहे.‘लव बेटिंग’ चित्रपटात चिराग पाटील, सयाजी शिंदे, अनंत जोग, राजेश शृंगारपुरे, स्मिता गोंदकर, कमलेश सावंत, वैभव मांगले, अनिकेत केळकर अशी जबरदस्त स्टारकास्ट एकत्र आली आहे. ड्रिम रोलबद्दल म्हणाल तर, ज्या भूमिका मला सोयीस्कररित्या करता येतील आणि मनापासून वाटेल अशाच भूमिका करण्यावर मी प्राधान्य देणार असून उगाच बोल्ड सीन देऊन भूमिका करायची म्हणून मी कधीच करणार नाही. संपूर्ण कुटुंबाला एकत्र पहाता येईल असे सिनेमा करण्याकडे माझे लक्ष असल्याचे काजलने सांगितले.‘लव बेटिंग’ सिनेमा व्यतिरिक्त काजल  राजु मेश्राम यांच्याच ‘हरणी’ आणि ‘दुरावा’ या मराठी सिनेमातही काम करतेय. तसेच एका अल्बम सोबत दोन हिंदी सिनेमांतही काजल झळकणार अाहे.