Join us

​जमली गुरू-शिष्याची जोडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2016 21:00 IST

मराठी चित्रपटसृष्टीतील ‘चॉकलेट बॉय’ म्हणजे स्वप्नील जोशी.  स्वप्नील सध्या जाम खूश आहे. कारण?? कारण म्हणजे,  स्वप्नीलला त्याच्या गुरुंसोबत काम ...

मराठी चित्रपटसृष्टीतील ‘चॉकलेट बॉय’ म्हणजे स्वप्नील जोशी.  स्वप्नील सध्या जाम खूश आहे. कारण?? कारण म्हणजे,  स्वप्नीलला त्याच्या गुरुंसोबत काम करण्याची संधी मिळतेयं.  स्वप्नीलचे हे गुरु म्हणजे ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर. होय, सचिन यांना  स्वप्नील गुरू मानतो. त्यांचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवत  स्वप्नीलने मराठी चित्रपटसृष्टीत स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. याच गुरूंसोबत काम करण्याची संधी  स्वप्नीलपुढे चालून आली आहे. साहजिकच  स्वप्नीलने ही संधी नाकारणे शक्यच नव्हते. दिग्दर्शक राकेश सारंग एक चित्रपट घेऊन येत आहेत. यात सचिन व  स्वप्नील  ही गुरू-शिष्याची जोडी झळकणार आहे. सिद्धार्थ चांदेकर यांचीही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. सचिन आणि  स्वप्नील गत तीन वर्षांपासून एकत्र काम करण्याचा विचार करत आहेत. अखेर हा योग जुळून आलाच...तेव्हा आॅल दी बेस्ट  स्वप्नील!!