Join us

जिवाभावाच्या फ्रेंडसची परिक्षा एकाच दिवशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2016 17:22 IST

परिक्षा कोणती ही असो, आपल्या फ्रेडसमध्ये बाजी  कोण मारणार याची उत्सुकता सर्वानाच लागलेली असते. सध्या अशीच काहीशी परिस्थिती मराठी ...

परिक्षा कोणती ही असो, आपल्या फ्रेडसमध्ये बाजी  कोण मारणार याची उत्सुकता सर्वानाच लागलेली असते. सध्या अशीच काहीशी परिस्थिती मराठी इंडस्ट्रीमध्ये निर्माण झालेली दिसते. मराठी इंडस्ट्रीमध्ये भूषण प्रधान, संस्कृती बालगुडे, पूजा सावंत, वैभव तत्ववादी हे सर्व कलाकार एकमेकांचे खूप छान फ्रेंडस आहेत. एकदम जिवाभावाची यांची यारी आहे. पण सध्या झालं काय या सर्व फ्रेडंसचा चित्रपट जून महिन्यात एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे हे चौघेही जेवढे उत्साही आहेत, तेवढेच थोडे चिंताजनक देखील आहेत. याविषयी लोकमत सीएनएक्सशी बोलताना भूषण प्रधान म्हणाला, आम्ही चौघे बेस्ट फ्रेडंस आहोत. मागच्या वर्षी आॅगस्ट महिन्यात देखील आमच्या चौघांचा चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाला होता. योगायोगाने यंदा ही हा दिवस उजडणार आहे. आमची एक प्रकारची ही परिक्षाच आहे म्हणावं लागणार आहे. चला, तर वाट पाहूयात की या जिवाभावाच्या फ्रेंडसमध्ये बाजी कोण मारणार?