Join us

जितू झाला शाल्मलीचा फॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2016 13:42 IST

              शाल्मली खोलगडेच्या आवाजाचे दिवाने तर अनेकजण आहेत. रॉकस्टारची इमेज असलेल्या शाल्मलीची तरूणांमध्ये ...

 
             शाल्मली खोलगडेच्या आवाजाचे दिवाने तर अनेकजण आहेत. रॉकस्टारची इमेज असलेल्या शाल्मलीची तरूणांमध्ये सध्या क्रेझ आहे. बॉलिवूडमधील अनेक टॉपच्या अभिनेत्रींना आवाज दिलेल्या शाल्मलीचे फॅन तर बरेच पाहायला मिळतील. पण तिच्या या चाहत्यांमध्ये एका मराठमोळ््या कलाकाराची भर पडली आहे. जितेंद्र जोशी शाल्मलीच्या आवाजाचा फॅन असल्याचे समजत आहे. असे त्यानेच सोशल साईट्सवर सांगितले आहे. नूकतीच शाल्मली तिच्या आईसोबत जितेंद्र जोशी आणि गिरीजा ओक यांच्या दोन स्पेशल या नाटकाच्या प्रयोगाला गेली होती. त्यावेळी जितेंद्र भलताच खुष झाला. तो म्हणतोय, शाल्मली दोन स्पेशल नाटक पाहताना प्रेक्षकांमध्ये बसली होती. तर मी पण माझा बेस्ट परफॉरमन्स यावेळी दिला. मी तिचा फॅन आहे. आणि ती खरच रॉकस्टार आहे. जितेंद्रला झालेला हा आनंद पाहता तो सध्या जाम खुष आहे, असेच म्हणावे लागेल.