Join us
Daily Top 2Weekly Top 5

​जितेंद्र जोशी करतोय आमिर खानच्या पाणी फाऊंडेशनसाठी काम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2017 17:12 IST

जितेंद्र जोशी आज मराठी चित्रपटसृष्टीतील मोठे नाव आहे. त्याने तुकाराम, दुनियादारी यांसारख्या चित्रपटातून त्याच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. गंभीर, ...

जितेंद्र जोशी आज मराठी चित्रपटसृष्टीतील मोठे नाव आहे. त्याने तुकाराम, दुनियादारी यांसारख्या चित्रपटातून त्याच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. गंभीर, विनोदी, खलनायकी यांसारख्या सगळ्या भूमिका अतिशय ताकदीने पेलणारा अष्टपैलू अभिनेता म्हणून त्याने त्याची ओळख निर्माण केली आहे. जितेंद्रने अभिनयासोबतच एक गीतकार म्हणूनदेखील स्वतःचे प्रस्थ निर्माण केले आहे. कोंबडी पळाली...सारखे गाणे त्याने लिहिले आहे. कुठलीही भूमिका असो त्याच्याशी जितेंद्र एकरूप होऊन जातो. एकाच साच्यातील भूमिका न साकारता वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारणे हे त्याचे वैशिष्ट्य आहे. अभिनयासोबतच एक सूत्रसंचालक म्हणूनदेखील त्याने आपले नाव कमावले आहे.जितेंद्रने नुकतीच फेसबुकला एक पोस्ट टाकली असून त्या पोस्टची चांगलीच चर्चा होत आहे. कारण या पोस्टसोबत जितेंद्रने एक फोटो पोस्ट केला आहे आणि या फोटोत त्याच्यासोबत मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आहे. आमिर खानसोबतचा एक फोटो पोस्ट करून त्यासोबत तुफान आलंया... असे कॅप्शन त्याने लिहिले आहे. जितेंद्र आणि आमिरचा हा फोटो पाहून ते एखाद्या चित्रीकरणासाठी एकत्र आले असल्याचे आपल्याला दिसून येत आहेत. जितेंद्रने आमिरसोबत फोटो पोस्ट केल्यानंतर या फोटोला अनेक लाइक मिळत असून अनेकांनी या फोटोवर कमेंटदेखील केल्या आहेत. जितेंद्र आणि आमिर कोणत्या प्रोजेक्टसाठी एकत्र आले आहेत याची चर्चादेखील सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. आमिर आणि जितेंद्र चित्रपटात एकत्र झळकणार का अशी सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे. आमिर सध्या त्याच्या पाणी फाऊंडेशनच्या कामात व्यग्र आहे आणि यासाठी त्याची आणि जितेंद्रची भेट झाली असल्याचे कळतेय. जितेंद्र सध्या आमिर खानसोबत पाणी फाऊंडेशनचे काम करत असल्याचे कळतेय.