Join us
Daily Top 2Weekly Top 5

जितेंद्र झाला गावरान कोंबडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2016 15:33 IST

             रांगडा अभिनय करुन प्रेक्षकांच्या मनावर स्वत:ची छाप उमटविणारा आपला जितेंद्र जोशी हा गावरान ...

             रांगडा अभिनय करुन प्रेक्षकांच्या मनावर स्वत:ची छाप उमटविणारा आपला जितेंद्र जोशी हा गावरान कोंबडा झालाय अस सांगितल तर आश्चर्य वाटेल ना. पण हो जितुगावरान कोंबडा झालाय . आता तो गावरान कोंबडा कसा झाला तर हेमंत ढोमे दिग्दर्शीत बघतोस काय मुजरा कर या चित्रपटातील एका गाण्यात जितूने गावरान कोंबड्याचे आवाज काढले आहेत. आवाज वाढव डिजे नंतर गावरान कोंबड्याच्या रुपात एक भन्नाट गाण आता लवकरच आपल्याला पहायला मिळणार आहे. या गाण्या संदर्भात हेमंतने सीएनएक्सला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली, तो म्हणाला, आवाज वाढव डिजे या गाण्यानंतर आता पुन्हा एकदा, अमितराज, क्षितीज पटवर्धन आणि आदर्श शिंदे ही टिम एकत्र आली आहे. गावरान कोंबडा हे सेलिब्रेशन साँग आहे. साताºयामध्ये या गाण्याचे चित्रीकरण होत असुन यामध्ये मी स्वत: परफॉर्म करताना तुम्हाला दिसेल. तर या गाण्याचे संगीतकार अमितराज याने त्याचा एक्सपीरियन्स शेअर करताना सांगितले, जेव्हा मी क्षितीज अन आदर्श एकत्र येतो तेव्हा काम करायला मजा येते . आवाज वाढव नंतर प्रेक्षकांच्या अपेक्षा नक्कीच वाढल्या आहेत अन त्याच तोडीच गावरान कोंबडा हे गाण आहे. आम्ही रात्रभर रेकाँर्डींग केले आहे. खुप मजा मस्ती करीत हे गाण कम्लिट झालय. कोंबड्याच्या आरवण्यापासुनच गाण्यातील आवाज जितेंद्र जोशीने काढले आहेत. गावरान कोंबडा हे गाणे आपल्याला आनंद शिंदे यांच्या ठसकेबाज आवाजात एकायला मिळणार आहे. तर या चित्रपटात आदर्शने देखील एक पोवाडा गायला आहे. आता पाहुयात हा गावरान कोंबड्याच्या तालावर प्रेक्षक किती थिरकतायत ते.