Join us
Daily Top 2Weekly Top 5

'व्हेंटीलेटर' सिनेमाच्या गुजराती रिमेकमध्ये झळकणार जग्गुदादा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 14:26 IST

सुंदर कथा,त्याला राजेश म्हापुसकर यांचं लाभलेलं दिग्दर्शन आणि कलाकारांचा तितकाच दमदार तसंच सशक्त अभिनय यामुळे व्हेंटिलेट सिनेमानं रसिकांवर जादू ...

सुंदर कथा,त्याला राजेश म्हापुसकर यांचं लाभलेलं दिग्दर्शन आणि कलाकारांचा तितकाच दमदार तसंच सशक्त अभिनय यामुळे व्हेंटिलेट सिनेमानं रसिकांवर जादू केली.त्यामुळे व्हेंटिलेटर सिनेमानं विविध पुरस्कारतही बाजी मारली. इतकंच नाहीतर मानाच्या राष्ट्रीय पुरस्कारांवरही व्हेंटिलेटरने छाप पाडली.सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक,सर्वोत्कृष्ट संकलन (एडिटिंग) आणि सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफी या तीन गटातील राष्ट्रीय पुरस्कार व्हेंटिलेटर सिनेमानं आपल्या नावावर केले. आता मराठी रुपेरी पडदा गाजवणारा व्हेंटिलेटर सिनेमा आता गुजराती रिमेक होणार आहे.मराठीनंतर आता गुजरातीत हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे.विशेष म्हणजचे गुजराती रिमेकमध्ये जॅकी श्रॉफ झळकणार आहेत.आशुतोष गोवारीकर यांची भूमिका जॅकी श्रॉफ साकारणार आहेत.रिमेकची कथा निरेन भट्ट यांनी लिहीली आहे तर उमंग व्यास या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.व्हेंटिलेटर या मराठी सिनेमाचं नाट्य रुपांतर गुजराती रंगभूमीवर आणण्याचा निर्धार राजेश जोशी यांनी केला आहे. व्हेंटिलेटर सिनेमाचं गुजराती नाट्य रुपांतर होत असल्याबद्दल व्हेंटिलेटर सिनेमाची निर्माती प्रियांका चोप्राच्या आई डॉ. मधु चोप्रा यांनीही आनंद व्यक्त केला आहे. एखाद्या गाजलेल्या सिनेमाचं नाट्य रुपांतर होणं ही एक दुर्मिळ गोष्ट आहे.सिनेमानं राष्ट्रीय पातळीवर डंका वाजवला आहे, रसिकांची मनं जिंकली आहेत. आता तेच प्रेम गुजराती रसिकांकडून गुजराती रंगभूमीवरही मिळावं अशी अपेक्षा मधु चोप्रा यांनी व्यक्त केली आहे.'व्हेंटिलेटर' सिनेमा नाट्य रुपांतर करुन रंगभूमीवर आणताना त्या सिनेमाच्या कथेत कोणताही बदल केला जाणार नाही. फक्त गुजरात नाट्य रसिकांची आवड लक्षात घेऊन सिनेमाची कथा मांडण्याचा प्रयत्न राजेश जोशी करणार आहेत.यापैकी नाटकातील काही सीन्स पाहिल्याचे आणि ते योग्यरित्या मांडल्याचं मधु चोप्रा यांनी सांगितले आहे.राजेश जोशी यांचं 'कोडमंत्र' हे नाटक सध्या गुजरात रंगभूमीवर तुफान गाजत आहे.गुजराती नाट्य रसिकांची मनं जिंकणारं हे नाटक गुजराती रंगभूमीवरील सगळ्यात महागडं नाटक असल्याचं बोललं जात आहे. बॉलिवूडमधून हॉलिवूडमध्ये आपला जलवा दाखवित असलेली देसी गर्ल प्रियंका चोपडा हिचे मराठीबद्दलचे प्रेम कधीच लपून राहिले नाही. त्यामुळेच ‘व्हेंटिलेटर’च्या यशानंतर प्रियंका पुन्हा एकदा मराठी चित्रपट घेऊन येत आहे.प्रियंका चोपडाच्या प्रॉडक्शन हाउसअंतर्गत दुस-या ‘फायरब्रॅण्ड’ या मराठी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यात आली असून,त्याचे एक पोस्टरही समोर आले आहे.प्रियंकाच्या होम प्रॉडक्शन पर्पल पेबल पिक्चर्सकडून आमच्या आगामी ‘फायरब्रॅण्ड’ या चित्रपटासोबत २०१८ चे स्वागत’ असे ट्विट करण्यात आले आहे.