Join us

प्लास्टिकच्या समस्ये विरोधात जागर अभिनेता अजिंक्य देव यांचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2018 12:22 IST

पुढील काळात प्लास्टिकची समस्या अत्यंत भयावह रूप धारण करणार असल्याची जाणीव लक्षात घेत  तसेच पर्यावरण आणि पर्यायानं स्वत:पुढील आगामी ...

पुढील काळात प्लास्टिकची समस्या अत्यंत भयावह रूप धारण करणार असल्याची जाणीव लक्षात घेत  तसेच पर्यावरण आणि पर्यायानं स्वत:पुढील आगामी समस्या टाळण्यासाठी काहीतरी करायला हवं या उद्देशाने ‘ग्लोबल एन्विरो सोल्युशन्स’ एनजीओ व अभिनेता अजिंक्य देव यांच्या ‘अॅकेडमी ऑफ लर्निग अँड डेव्हलपमेंट’ या स्पेशल स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या सहकार्याने प्लास्टिकबंदीचं महत्त्व पोहोचवण्यासाठी व त्याचा वापर टाळण्यासाठी अंधेरी येथील संगीतकार अनिल मोहिले मनोरंजन पार्कमध्ये नुकतेच एका जनजागृती मोहिमेचं आयोजन करण्यात आले होते. ‘अॅकेडमी ऑफ लर्निग अँड डेव्हलपमेंट’स्कूलमधील स्पेशल विद्यार्थी उत्साहाने या कार्यक्रमात सहभागी झाले होते.प्लास्टिक बॅग टाळण्यासाठी ‘से नो टू प्लास्टिक बॅग’ ची हाक यावेळी देण्यात आली. तसेच NMIMS या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यानी “Be a part of Solution and not Pollution” या पथनाट्याच्या माध्यामतूनही प्लास्टिक हा घटक अधिक धोकादायक असल्याचे दर्शनात आणून दिले.प्लास्टिकचा वापर टाळल्यावर पर्यावरण संवर्धनाला तुमचा हातभारही लागेल, हे सुद्धा पथनाट्यातून यावेळी पटवून देण्यात आलं. विशेष संदेश लिहिलेल्या कापडी पिशव्या यावेळी अत्यंत वाजवी किंमतीत उपस्थितीतांना देण्यात आल्या.प्लास्टिकच्या पिशव्या,चहाचे कप,प्लास्टिकच्या बाटल्या यांच्या अतिरिक्त वापरामुळे निसर्गाची हानी होत असल्याने,प्लास्टिकचा वापर प्रत्येकाने टाळणं आवशयक आहे.या मोहिमेच्या निमित्ताने एका  चांगल्या कार्याचा भाग होता आल्याचं समाधान निश्चित आहे असं सांगत,प्लास्टिक वापराचा धोका आपण वेळीच ओळखला नाही तर भविष्यात त्याचे दूरगामी परिणाम आपल्यालाच भोगावे लागतील याची जाणीवसुद्धा अभिनेते अजिंक्य देव यांनी यावेळी करून दिली.या जनजागृती मोहिमेदरम्यान अभिनेते रमेश देव अभिनेत्री सीमा देव व त्यांच्या कुटुंबीयांची विशेष उपस्थिती लाभली.