Join us
Daily Top 2Weekly Top 5

असे झाले, रेणुका-आशुतोषचे लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 15:38 IST

            रेणुका शहाणेने अनेक हिंदी-मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनामध्ये स्थान निर्माण केले आहे. ...

 
           रेणुका शहाणेने अनेक हिंदी-मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनामध्ये स्थान निर्माण केले आहे. नेहमी हसतमुख असणाऱ्या रेणुकाच्या एका हास्यावरच तिचे अनेक चाहते घायाळ होतात. नुकताच रेणुकाने तिचा ५० वा वाढदिवस साजरा केला. कुटूंबासोबत तिने हा खास क्षण साजरा केला. आशुतोष सोबतचा एक फोटोही रेणुकाने सोशल मीडियावर शेअर केला. तिच्या आणि आशुतोषच्या संसाराला 16 वर्ष पूर्ण झाली. २५ मे २००१ साली  मध्य प्रदेशमधल्या छोट्याशा गावात या दोघांचे लग्न झाले. लग्नाच्या आठवणींना उजाळा देताना गावी गेल्यानंतरचा खूप विचित्र अनुभव आल्याचे रेणुकाने एका मुलाखतीत सांगितले होते. रेणुका आपल्या कुटुंबासोबत जेव्हा स्टेशनवर उतरली तेव्हा तिथे हजार-दीड हजाराचा जमाव होता. एखाद्या पक्षाचा राजकीय मेळावा असावा, असंच काहीसं दृश्य तिथे निर्माण झाले होते. ज्या हॉटेलमध्ये त्यांची राहायची व्यवस्था करण्यात आली होती त्या हॉटेलचे उद्धाटनही रेणुकाच्या हस्ते झाले. लग्नात इतकी गर्दी होती, की रेणुकाचे आई-वडील आणि नातेवाईक मंडपापर्यंत पोहोचूच शकले नाहीत. त्यामुळे रेणुकाच्या नणंदेने तिचे कन्यादान केले.