इशान शंकरने दिली हृदयांतर या चित्रपटाच्या सेटला भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2017 16:19 IST
विक्रम फडणीसच्या हृदयांतर या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. या चित्रपटात मुक्ता बर्वे, सुबोध भावे प्रमुख भूमिका साकारत ...
इशान शंकरने दिली हृदयांतर या चित्रपटाच्या सेटला भेट
विक्रम फडणीसच्या हृदयांतर या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. या चित्रपटात मुक्ता बर्वे, सुबोध भावे प्रमुख भूमिका साकारत आहेत. हृदयांतर या चित्रपटाचा मुहूर्त सुपरस्टार शाहरुख खानच्या हस्ते पार पडला होता. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटाच्या गीतांची कोरिओग्राफी ही प्रसिद्ध कोरिओग्राफर शामक दावर करत आहेत. या चित्रपटाच्या सेटवर अभिनेता इशान शंकर याने नुकतीच सरप्राइज भेट दिली. विक्रम हृद्यांतर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असला तरी तो प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. सध्या तो अब्बास-मस्तान यांच्या मशिन या चित्रपटासाठी कॉस्च्युम डिझाइन करत आहे. या चित्रपटाद्वारे मुस्तफा बर्मावाला, कियारा अडवाणी, कार्ला डिनीस आणि इशान शंकर हे नवोदित कलाकार इंडस्ट्रीत पदार्पण करत आहेत. या चित्रपटाचे नुकतेच चित्रीकरण अमेरिकेतल्या जॉर्जिया येथे सुरू होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी विक्रम रोज या चित्रपटाच्या टीमला डिनरची ट्रीट देत असे. त्यामुळे या चित्रपटाच्या स्टार कास्टसोबत विक्रमची चांगलीच गट्टी जमलेली आहे. त्यामुळे या चित्रपटातील नायक इशान शंकरने नुकतीच हृद्यांतर या चित्रपटाच्या सेटवर जाऊन विक्रमची भेट घेतली. याविषयी इशान सांगतो, "विक्रमच्या हृद्यांवर या चित्रपटाच्या सेटवर जाऊन त्याची भेट घेण्याची माझी कित्येक दिवसांपासूनची इच्छा होती. त्यामुऴेच मी वेळात वेळ काढून या चित्रपटाच्या सेटवर गेलो. मशिन या चित्रपटाच्या निमित्ताने माझी सगळ्यात पहिल्यांदा विक्रमशी भेट झाली. भेटीच्या पहिल्या दिवसापासूनच आमची खूप चांगले मित्र बनलो आहोत. मला सेटवर पाहून विक्रम खूपच खूश झाला होता. त्याच्यासोबतच मी शामक दावर यांनादेखील भेटलो."