Join us
Daily Top 2Weekly Top 5

ईशा केसकरने शेअर केला अभिनेता ऋषी सक्सेनासोबत क्युट फोटो, फॅन्सनी केला लाईक्सचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2021 19:00 IST

ईशाने इन्स्टाग्रामवर अभिनेता ऋषी सक्सेनासोबतचा फोटो शेअर केला आहे.

ईशाला जय मल्हार या मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली. या मालिकेत तिने साकारलेली बानोची भूमिका चांगलीच गाजली होती. ईशा सोशल मीडियावर बराच सक्रीय असते. या माध्यमातून तीआपल्या फॅन्सशी जोडला गेला आहे. त्यांच्याशी तो सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सशी संवाद साधतो, स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ तो शेअर करत असते. ईशाने अलीकडेच इन्स्टाग्रामवर अभिनेता ऋषी सक्सेनासोबतचा फोटो शेअर केला आहे. फोटोत दोघांची जोडी खूपच क्युट दिसते. दोघांनी फोटोत ट्रेडिशनल कपडे परिधान केले आहेत. फॅन्सनी दोघांच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.          

 ईशा केसकर अभिनेता ऋषी सक्सेनासोबत रिलेशनशीपमध्ये आहे. गेल्या तीन वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करतायेत.चला हवा येऊ द्याच्या सेटवर ऋषी आणि ईशा यांची ओळख झाली होती. दोघांमधील रोमाँटिक केमिस्ट्री त्यांच्या फॅन्स आवडते. 

काहे दिया परदेस या मालिकेत ऋषी सक्सेनाने शिवची भूमिका साकारली होती. ऋषी हा अमराठी असला तरी त्याने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. लवकरच तो रिंकु राजगुरु, प्रार्थना बेहरे आणि सुव्रत जोशीसोबत 'छुमंतर' सिनेमात दिसणार आहे.  

टॅग्स :ईशा केसकरऋषी सक्सेना