Join us
Daily Top 2Weekly Top 5

इराण-इस्रायलमध्ये भयंकर युद्ध अन् परदेशात फिरायला गेले सिद्धार्थ-मिताली, शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 12:25 IST

एकीकडे युद्धजन्य परिस्थिती सुरू असताना मराठी इंडस्ट्रीतील लाडकं कपल सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर परदेशात फिरायला गेले आहेत. 

अमेरिका-इराण-इस्रायलच्या युद्धाचे पडसाद संपूर्ण जगभरात उमटत आहेत. अमेरिकेने इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांची हत्या केल्यानंतर इराणने इतर देशांमध्ये असलेल्या अमेरिकेच्या सैन्य तळांवर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सध्या सगळीकडेच तणावाचं वातावरण आहे. परदेशात गेलेले अनेक नागरिक तिकडेच अडकून पडले आहेत. एकीकडे युद्धजन्य परिस्थिती सुरू असताना मराठी इंडस्ट्रीतील लाडकं कपल सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर परदेशात फिरायला गेले आहेत. 

सिद्धार्थ आणि मिताली हे अनेकदा परदेशी वारी करत असतात. याचे फोटो आणि व्हिडीओही ते शेअर करताना दिसतात. एकीकडे इराण-इस्रायलमध्ये भयंकर युद्ध सुरू असताना दुसरीकडे सिद्धार्थ-मितालीने थेट सिंगापूरला पोहोचले आहेत. याचे फोटो मिताली आणि सिद्धार्थने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केले आहेत. सिंगापूरमधील काही प्रेक्षणीय स्थळांना सिद्धार्थ आणि मितालीने भेटीदेखील दिल्या आहेत. 

सिद्धार्थ आणि मिताली हे कलाविश्वातील लोकप्रिय कपल आहेत. सिद्धार्थने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. अलिकडेच तो 'क्रांतीज्योती विद्यालय' आणि 'माया' या सिनेमांमध्ये दिसला होता. तर माधुरी दीक्षितच्या 'मिसेस देशपांडे' या वेब सीरिजमध्येही तो मुख्य भूमिकेत होता. मिताली सध्या कलाविश्वापासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर सक्रिय असते. गेल्या वर्षी 'फसक्लास दाभाडे' या सिनेमात ती दिसली होती. 

English
हिंदी सारांश
Web Title : Iran-Israel War: Siddharth and Mitali vacation abroad, share photos.

Web Summary : Amidst Iran-Israel conflict, Marathi actors Siddharth Chandekar and Mitali Mayekar are vacationing in Singapore. They shared photos of their trip, visiting local attractions. Siddharth was recently seen in 'Kranti Jyoti Vidyalaya' and Mitali in 'Fasaklass Dabhade'.
टॅग्स :सिद्धार्थ चांदेकरमिताली मयेकरइराणइस्रायल