Join us

'झपाटलेला'मध्ये निवेदिता सराफ यांना या एका कारणामुळे दाखवण्यात आला बाहेरचा रस्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 06:00 IST

Zapatlela : ‘झपाटलेला’ या चित्रपटात दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे, दिग्दर्शक महेश कोठारे, दिलीप प्रभावळकर हे महत्त्वाच्या भूमिकेत होते. या चित्रपटाची आजही लोक आठवण काढतात.

मराठी चित्रपटसृष्टीत असे काही सिनेमे आहेत ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप उमटवली आहे. हे चित्रपट आजही लोक तितक्याच आवडीनं पाहतात. नव्वदच्या काळात मराठी सिनेसृष्टीत अशोक सराफ- रंजना, लक्ष्मीकांत बेर्डे- प्रिया बेर्डे, सचिन- सुप्रिया, महेश कोठारे- निवेदिता सराफ या जोड्या खूप हिट झाल्या होत्या. बऱ्याच सिनेमात या जोड्यांना एकत्र पाहिले गेले होते, परंतु एका चित्रपटात मात्र केवळ अभिनेत्रीचे लग्न झाल्यामुळे ती जोडी तुटली. ही जोडी म्हणजे महेश कोठारे आणि निवेदिता सराफ. झपाटलेला चित्रपटात निवेदिता यांचे लग्न झाल्यामुळे त्यांच्याजागी किशोरी आंबिये यांची निवड करण्यात आली होती. 

‘झपाटलेला’ या चित्रपटात दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे, दिग्दर्शक महेश कोठारे, दिलीप प्रभावळकर हे महत्त्वाच्या भूमिकेत होते. या चित्रपटाची आजही लोक आठवण काढतात. या चित्रपटात अभिनेत्री निवेदिता सराफ यादेखील असे सर्वांना वाटले होते. मात्र नंतर त्यां आणि त्यांच्याऐवजी किशोरी आंबियेंची निवड करण्यात आली होती. त्यावेळी महेश कोठारे आणि निवेदिता यांच्यात काहीतरी बिनसल्याची चर्चा सुरु झाली होती. पण तेव्हा नक्की असे का केले याचा खुलासा महेश कोठारेंनी आपल्या आत्मचरित्रात केला आहे. 

गौरी पात्रासाठी निवेदिता सराफऐवजी किशोरी आंबियेंची झाली निवडमहेश कोठारे यांनी आत्मचरित्रात लिहिले की, झपाटलेला या चित्रपटात ज्या प्रेमळ भावनांची गरज नायक आणि नायिकेमध्ये दिसावी लागते. त्यासाठी लग्न झालेली अभिनेत्री मला नको होती. नेमके त्यावेळी अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचे लग्न झाले होते. त्यामुळे भूमिकेतून हवी असलेली ती भावना मिळाली नसती म्हणून मी गौरी हे पात्र निवेदिता सराफऐवजी अभिनेत्री किशोरी आंबियेंना दिले.

टॅग्स :निवेदिता सराफमहेश कोठारे