Join us

ओळखा पाहू फोटोत दिसणारी कोण आहे ही चिमुरडी,जी आहे आजची आघाडीची नायिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2017 11:30 IST

सेलिब्रिटी आपल्या कलेने म्हणजेच अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळतात. त्यांची प्रत्येक गोष्ट रसिकांना भावते. त्यांच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून ...

सेलिब्रिटी आपल्या कलेने म्हणजेच अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळतात. त्यांची प्रत्येक गोष्ट रसिकांना भावते. त्यांच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी रसिक उत्सुक असतात. अशाच अनेक गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे बालपण. आपले लाडके कलाकार बालपणी कसे दिसत असतील. ते कसे होते हे जाणून घेण्याची प्रत्येकाला इच्छा असते. बालपणी प्रत्येकजण धम्माल करतो.ही बालपणीची धम्माल मस्ती फोटोत कैद असते. फोटोमधूनच प्रत्येकजण आपल्या बालपणीच्या आठवणीत रमून जातो. आजवर आपण ब-याच कलाकारांचे बालपणीचे फोटो पाहिले आहे.मराठमोळी अभिनेत्री मुक्ता बर्वे हिचे असेच बालपणीचे फोटो समोर आले आहेत. या दोन्ही फोटोमधील चिमुकल्या मुक्ताचा गोंडस अवतार तुम्हालाही प्रेमात पाडेल.मुक्ताच्या अगदी बालपणीचा एक आणि दुसरा फोटो तिचा थोडा मोठं झाल्यानंतरचा असे हे दोन फोटो आहेत.एका फोटोत चिमुकल्या मुक्ताने फ्रॉक परिधान केला आहे.तिने एका हातात फुलं तर दुस-या हाताला बॅग अडकवली आहे. दुस-या फोटोमध्ये मुक्ताने बॉयकट लूकमधील मुक्ताने शर्ट परिधान केला आहे. मुक्तांच्या या दोन्ही फोटोतील स्मित हास्य तुम्हाला नक्कीच प्रेमात पाडेल. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात. मुक्ताच्या या फोटोमधील चेह-यावरील हावभाव बरंच काही सांगून जातात. चेह-यावरील हे हावभाव पाहून मुक्तामध्ये अभिनयाचे गुण हे बालपणापासूनच होते असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. त्यामुळेच की काय छोटा पडदा असो किंवा मग मोठा पडदा किंवा मग रंगभूमी असो. प्रत्येक माध्यमामध्ये मुक्ताने आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. प्रत्येक माध्यमात वैविध्यपूर्ण भूमिका साकारुन मुक्ताने आपली वेगळी छाप पाडली आहे. सध्या मुक्ता बर्वेची रुद्रम ही मालिका छोट्या पडद्यावर गाजत आहे. या मालिकेतील मुक्ताचा लूक आणि तिची भूमिका रसिकांना भावते आहे. या भूमिकेप्रमाणेच मुक्ताचे हे बालपणीचे फोटोही तुम्हालाही नक्कीच भावतील.Also Read:मुक्ता बर्वेचा हा व्हिडीओ,एक पब्लिसीटी स्टंट?