Join us

'घरभाडं द्यायला गेलं आणि त्या नगरसेवकानं मला...', तेजस्विनी पंडितचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 14:15 IST

Tejaswini Pandit : अभिनेत्री तेजस्विनी पंडितने आयुष्यातील एक धक्कादायक खुलासा केला आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित(Tejaswini Pandit)ने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. आता तिने अथांक वेबसीरिजमधून निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. या वेबसीरिजला प्रेक्षकांचा चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. या वेबसीरिजनिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत तेजस्विनीने धक्कादायक खुलासा केला आहे.

सिनेपत्रकार सौमित्र पोटे यांच्या पॉडकास्ट मुलाखतीमध्ये तेजस्विनी पंडित हिने कारकीर्दीच्या सुरुवातीला आलेल्या दिवसांमध्ये अनुभवांबाबत भाष्य केले आहे. यावेळी तिने काही धक्कादायक खुलासादेखील केला आहे. यावेळी करिअरच्या सुरुवातीच्या काळात एका नगरसेवकाने तिला थेट ऑफर दिल्याचे सांगितले आहे.

तेजस्विनी पंडित म्हणाली की, मी सिंहगड रोडला राहायचे. तेव्हा सिंहगड रोडमधल्या नगरसेवकाच्या एका घरी मी भाड्याने राहत होते. घराचे भाडे देण्यासाठी त्या नगरसेवकाच्या मी ऑफिसला गेले होते. त्यावेळी मला असे कळले की या लोकांचा आपल्या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टीकोनच वेगळा असतो. कारण एक आंबा नासका निघाला की बाकी सगळे नासके आहेत असं म्हटलं जातं. किंवा दुसरे आंबे नासके आहेत का? हे पाहिले जाते.

तिने पुढे सांगितले की, मी घरभाडे द्यायला गेले आणि त्या व्यक्तीने मला थेट ऑफर केली. २००९ व २०१०च्या दरम्यान ही घटना घडली. त्याने जेव्हा मला ऑफर केली. त्याक्षणी माझ्या समोर फक्त एक पाण्याचा ग्लास होता. मी तेच ग्लासातलं पाणी त्या व्यक्तीच्या तोंडावर फेकले. मी अशा गोष्टी करायला इकडे आलेली नाही. अन्यथा मी भाड्याने राहिले नसते. कलाविश्वात मला अशाच पद्धतीने पैसे कमवायचे असते तर मी गाड्या, घर असं काय काय खरेदी केले असते. तुमची परिस्थिती तसेच तुम्ही कलाक्षेत्रात काम करत आहात हे पाहून तुम्हाला अशाप्रकारच्या गोष्टी विचारल्या जातात. अशा अनेक प्रसंगांनी खूप काही शिकवले.

टॅग्स :तेजस्विनी पंडित