Join us

"मी लिपस्टिकचं समर्थन करत नाही", #BanLipstick व्हिडीओ चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 12:59 IST

tejaswini_pandit चा असाच एक व्हिडीओ सध्या तिच्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरला आहे. तेजस्विनीने नुसताच हा व्हिडीओ शेअर केलेला नाहीय. तर व्हिडीओला एक खास कॅप्शनही दिले आहे.

सिनेमा, रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी तेजस्विनी सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टिव असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्ससह संवाद साधत असते. शिवाय आपले फोटो आणि व्हिडीओसुद्धा ती फॅन्सबरोबर शेअर करत असते.सोशल मीडियावर तिचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. तिच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यात तिच्या चाहत्यांनाही तितकाच रस असतो.सोशल मीडियावर तिच्या प्रत्येक फोटोला व्हिडीओला चाहते तितकीच पसंती देत असल्याचे पाहायला मिळते. मात्र तिच्या एका व्हिडीओने चाहत्यांनाच संभ्रमात पाडल्याचे पाहायला मिळत आहे. 

तेजस्विनीचा असाच एक व्हिडीओ सध्या तिच्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरला आहे. तेजस्विनीने नुसताच हा व्हिडीओ शेअर केलेला नाहीय. तर व्हिडीओला एक खास कॅप्शनही दिले आहे. ''मी लिपस्टिकचं समर्थन करत नाही.बॅन लिपस्टिक! #BanLipstick''  असे कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ तिने शेअर करण्यामागचे कारण स्पष्ट केले नसल्यामुळे चाहतेही संभ्रमात पडले आहेत. चाहतेच नाही तर सेलिब्रेटींनीसुद्धा हा व्हिडीओ पाहून तिला प्रश्न विचारत नेमकं झालं तरी काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. 

तर काही चाहत्यांना हा व्हिडीओ म्हणजे तिच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनचा एक भाग असल्याचे वाटत आहे. तुर्तास हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून चाहत्यांच्या नजरा वेधून घेत आहेत. व्हिडीओवर चाहतेही वेगवेगळ्या कमेंट्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे.  एका युजरने म्हटलंय ''मग लावलीच कशाला???🤔🤔 आणि लावायची होती तर पुसलीच कशाला??? काहीही करतात लोकं'','' एखादा नवीन चित्रपट येत असेल.....प्रमोशन साठी काहीपण 😂😂😂'',''आता हा काय नवीन ट्रेंड😂'' या सगळ्या कमेंट्स वाचून तुम्हालाही लक्षात आले असे की, चाहते तेजस्विनीच्या या व्हिडीओमागाचे उद्देश जाणून घेण्यात फार उत्सकु आहेत. तुर्तास तेजस्विनीनी अजूनतरी या व्हिडीमागचे कारण सांगितलेले नाहीय. त्यामुळे आता चाहतेही तेजस्विनीच्या या व्हिडीओमागचा उलगडा कधी करते याकडेच लक्ष लागले आहे हे मात्र नक्की.

टॅग्स :तेजस्विनी पंडित