Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तुला सोबत घेऊन जाता येणं शक्य नाही...'; सिद्धार्थ चांदेकरची पोस्ट आली चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 17:40 IST

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar)ची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे.

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar)ने विविधांगी भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. सिद्धार्थ सोशल मीडियावर सक्रीय असून तो या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. बऱ्याचदा तो सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. नुकतीच त्याची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे. त्याच्या या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.

सिद्धार्थ चांदेकरने सोशल मीडियावर घराचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्याने लिहिले की, तुला सोबत घेऊन जाता येणं शक्य नाही म्हणून, नाहीतर एका छोट्या पोतडीत बांधून कायमचं घेऊन गेलो असतो. किती काय काय पाहीलंयस तू. किती काय काय दाखवलंयस तू. किती लोक, किती प्रेम, किती भांडणं, किती अडचणी, किती आनंद. कित्ती कित्ती आठवणी. स्वप्नात येशील तेव्हा तुझ्याच एका कोपऱ्यात एका भिंतीला डोकं टेकवून बसेन. तुझ्या रंगावरून, फरशीवरून हात फिरवेन. मुटकुळं करून तुझ्या खिडकीशी झोपून जाईन. तेव्हापण असंच थोपट.. जसं इतकी वर्ष केलंस. 

त्याने पुढे लिहिले की, तुझा वास, तुझी धूळ, मुठीत घट्ट पकडून नेतोय. ज्या नवीन घरात चाललोय त्याला तुझ्या गोष्टी सांगेन. तुझ्या सारखं मिठी मारायला शिकवेन. आमच्यानंतर जे येतील त्यांना असंच प्रेम दे. पण आम्हाला विसरू नकोस. नीट राहा. नीट राहूदे. प्रेम. goodbyehome. सिद्धार्थ चांदेकरने नुकतेच नवीन घर घेतले आहे. तो आणि मिताली आता नवीन घरात शिफ्ट होत आहेत. जुने घर सोडताना सिद्धार्थ भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. त्याच्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

टॅग्स :सिद्धार्थ चांदेकर