Join us

नम्रता दिसणार मल्याळम चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 15:31 IST

         अभिनेत्री नम्रता गायकवाड लवकरच आपल्याला एका मल्याळम चित्रपटात दिसणार आहे. अयाल जीवी चिरिपुंडू असे ...

 
        अभिनेत्री नम्रता गायकवाड लवकरच आपल्याला एका मल्याळम चित्रपटात दिसणार आहे. अयाल जीवी चिरिपुंडू असे या चित्रपटाचे नाव आहे. सध्या ती कोचीनच्या निसर्गरम्य वातावरणात या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा आनंद घेते आहे. साऊथचा सुपरस्टार विजयबाबू सोबत ती मल्याळम चित्रपटात झळकणार आहे. तसेच नम्रताचा हा पहिलाच साऊथ सिनेमा आहे. याबद्दल सीएनएक्सला दिलेल्या मुलाखतीत नम्रता सांगते, हा चित्रपट जरी वेगळ्या भाषेत असला तरी मला चित्रपटाची कथा फार आवडली आणि म्हणून मी तो करण्याचा निर्णय घेतला. मी यामध्ये एका यशस्वी उद्योगिनीची भूमिका साकारते आहे. साऊथमध्ये काम करण्याचा अनुभव खुपच छान आहे. इथे प्रत्येक गोष्टीचे नियोजन असते. सेटवर कधीच गडबड गोंधळ नसतो. शांत वातावरणात शूटिंग करताना फक्त कामावर लक्ष केंद्रीत करता येते.