Join us
Daily Top 2Weekly Top 5

कधी होणार आई? महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळेनं फॅमिली प्लॅनिंगवर दिलं महत्त्वाचं अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 11:44 IST

हृता दुर्गुळे तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आली आहे.  

Hruta Durgule Pregnancy: 'फुलपाखरू' मालिकेतून घराघरात पोहोचलेली हृता दुर्गुळे 'महाराष्ट्राची क्रश' आहे. हृताने अनेक मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांची मनं जिंकली. काही मराठी सिनेमांमध्येही ती झळकली आहे. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा तिने उमटवला आहे.  सध्या हृता दुर्गुळे तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आली आहे.  

हृता सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती सोशल मीडियावर काम व वैयक्तिक आयुष्यातील खास क्षणांचे अपडेट्स चाहत्यांना देत असते. हृताने 18 मे 2022 ला प्रतिक शाहशी लग्न केलं होतं. हे जोडपं चाहत्यांचं लाडकं जोडपं आहे. लग्नानंतर फॅमिली प्लॅनिंगबद्दल तिचे चाहते तिला विचारत असतात. आता नुकतेच 'द मोटर माऊथ'च्या पॉडकास्टमध्ये हृताने फॅमिली प्लॅनिंगवर भाष्य केलं. 

हृता म्हणाली, "सध्यातरी आम्ही काहीच प्लान केला नाही... गो विथ द फ्लो या गोष्टीवर आमच्या दोघांचाही विश्वास आहे. आम्ही विचार केलेल्या गोष्टी खूप योग्यरित्या होतात. मी माझ्या आयुष्यात विचार केला नव्हता की मी कधी लग्न करेन. मी कोविडमध्ये माझ्या वडिलांना म्हणाले होते की, बाबा मला लग्न करायचं नाही. काही मागच्या अनुभवांमुळे मला असं वाटत होतं की हे खूप होतंय. पुन्हा सुरुवातीपासून सगळं सुरू करा. तुझा आवडता कलर कोणता, तुला काय आवडतं, मग डेट करा... हे सगळं परत करायचं नव्हतं. पण प्रतिकमुळे मला हे सगळं खूप सोपं वाटलं. पण, माझी आई म्हणत असते की बाळाचं प्लानिंग करावं लागेल". 

हृताने "दुर्वा" या मालिकेतून मनोरंजनविश्वात पदार्पण केले. यानंतर "फुलापाखरू" या मालिकेतून हृताला खरी ओळख मिळाली. "मन उडू उडू झालं" या सारख्या मालिकांमध्ये हृता दिसली. टाइमपास ३, अनन्या, कन्नी, सर्किट या सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. आता हृता ओटीटीवरुन प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.  

टॅग्स :ऋता दूर्गुळेप्रेग्नंसीमराठी अभिनेता