Join us

'मन उडू उडू झालं' मालिकेनंतर हृता दुर्गुळे आणि ऋतुराज फडके पुन्हा आले एकत्र, दिसणार या प्रोजेक्टमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 11:20 IST

महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे (Hruta Durgule) लवकरच एका हिंदी वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. ती या सीरिजमध्ये डॅशिंग महिला पोलीस अधिकारीच्या भूमिकेत दिसणार आहे. तिचे चाहते ही सीरिज पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे (Hruta Durgule) लवकरच एका हिंदी वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. याबद्दल तिनेच सोशल मीडियावर सांगितले. ती या सीरिजमध्ये डॅशिंग महिला पोलीस अधिकारीच्या भूमिकेत दिसणार आहे. तिचे चाहते ही सीरिज पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. या सीरिजमध्ये तिच्यासोबत मन उडू उडू झालं मालिकेतील सहकलाकार दिसणार आहे. हा सहकलाकार म्हणजे अभिनेता ऋतुराज फडके (Ruturaj Phadke). याबद्दल त्यानेच सोशल मीडियावर फोटो शेअर करत सांगितले.

ऋतुराज फडकेने अभिनेत्री हृता दुर्गुळेसोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, रचना आणि धवल. मन उडू उडू झालं ही मालिका आम्ही जवळ जवळ एक वर्ष केली. त्यामध्ये आमच्या दोघांचा एकही असा एकत्र सीन नव्हता. एकत्र सीन या हिंदी वेब सिरीजमध्ये आहे. हृतानी कमाल काम केले या वेब सीरिजमध्ये, मग ती अॅक्शन असो किंवा भले मोठे हिंदीमधले डायलॉग असो कमाल कमाल.. "कमांडो करण सक्सेना" ही वेबसीरिज बघायला तुम्हाला वेगळीच मज्जा येईल.

त्याने पुढे म्हटले की, कमांडर करण सक्सेना. चुनौती कितनी भी बडी हो, देश से बडा कुछ नहीं होता. पाहा कमांडर करण सक्सेना ८ जुलैला भेटीला येत आहे.

'कमांडर करण सक्सेना' ८ जुलैला भेटीला

पाकिस्तानचा एक कट उधळवून टाकण्याच्या तयारीत असलेल्या कमांडरची गोष्ट या वेब सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. हृताबरोबर या सीरिजमध्ये अभिनेता गुरमीत चौधरी आणि इक्बाल खान मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. ८ जुलैला ही वेब सीरिज हॉटस्टारवर प्रदर्शित केली जाणार आहे.

टॅग्स :ऋता दूर्गुळे