Join us

​मराठी अभिनेत्याच्या घरी आली नन्ही परी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 16:46 IST

आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे यांच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याची बातमी काहीच दिवसांपूर्वी मीडियात आली होती. ...

आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे यांच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याची बातमी काहीच दिवसांपूर्वी मीडियात आली होती. आदिनाथ आणि उर्मिलाचे फॅन्स ही बातमी ऐकून खूपच खूश झाले होते. आता आदिनाथ आणि उर्मिलानंतर आणखी एका मराठी अभिनेत्याकडे गुड न्यूज आहे.  आम्ही दोघे राजा राणी या मालिकेत तुषार साली एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकला होता. त्याने त्याचसोबत सखी या मालिकेत देखील काम केले होते. त्याने अनेक मराठी मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. तसेच क्राइम पेट्रोल या कार्यक्रमातही प्रेक्षकांना त्याला अनेकवेळा पाहायला मिळते. तुषारने प्रतिक्षा सोबत २०१५ मध्ये लग्न केले होते. प्रतिक्षा ही देखील एक अभिनेत्री आहे. त्यांच्या दोघांच्या आयुष्यात एक नन्ही परी आली आहे. प्रतीक्षाने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून तिनेच ही बातमी सोशल मीडियाद्वारे तुषार आणि तिच्या फॅन्सना सांगितली आहे. प्रतिक्षाने त्यांच्या मुलीचा फोटोदेखील सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. पण या फोटोत आपल्याला केवळ तिचे पाय पाहायला मिळत आहेत. या गोंडस पायावरून हे बाळ देखील तितकेच गोंडस असणार यात काही शंकाच नाही. तिने या फोटोसोबत म्हटले आहे की, या छोट्याशा बाळाच्या आगमनाने आमच्या आयुष्यात एक स्थान निर्माण केले असून आम्हाला झालेला आनंद मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. आम्ही या नव्या प्रवासासाठी सज्ज झालो आहेत. आमच्या आयुष्यात एका छोट्याशी परीचे आगमन झाले आहे. प्रतीक्षाने फेसबुकला पोस्ट केलेल्या या पोस्टला अनेक लाइक्स मिळत आहेत. तसेच अनेकजण यावर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. Also Read : ​आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारेच्या घरात लवकरच येणार नवा पाहुणा