Join us
Daily Top 2Weekly Top 5

१५ व्या पिफ अंतर्गत अपर्णा सेन, सीमा देव आणि उस्ताद झाकीर हुसैन यांचा सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2017 10:35 IST

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला नुकतीच सुरुवात झाली आहे. महोत्सवाचे हे १५ वे वर्ष असून आज डॉ. जब्बार पटेल, डॉ. ...

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला नुकतीच सुरुवात झाली आहे. महोत्सवाचे हे १५ वे वर्ष असून आज डॉ. जब्बार पटेल, डॉ. मोहन आगाशे, अरविंद आणि प्रकाश चाफळकर यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर बार्बरा एडर दिग्दर्शित थँकयू फॉर बॉम्बिंग (आॅस्ट्रिया) हा चित्रपट ओपनिंग फिल्म दाखविण्यात आला. तर इंडो - स्पेन मैत्रीला ६० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मिस मोनिका, सुब्रता डे आणि कारलॉस ब्लॅन्को यांनी फ्लेमिंको हा नृत्यप्रकारही यावेळी सादर करण्यात आला.                 भारतीय चित्रपटसृष्टीत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल बंगाली अभिनेत्री अपर्णा सेन आणि अभिनेत्री सीमा देव यांना जीवनगौरव पुरस्कार देत सन्मानित करण्यात आले. याशिवाय संगीत क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल दिला जाणारा यावषीर्चा एस. डी. बर्मन आंतरराष्ट्रीय क्रिएटिव्ह अ‍ॅवार्ड तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांना प्रदान करण्यात आला.  पुरस्काराला उत्तर एताना सीमा देव यांनी आपली आई यांना गुरु राजा परांजपे यांना पुरस्कार अर्पण केला. तर अपर्णा सेन यांनी दिवंगत अभिनेते ओम पुरी यांना पुरस्कार अर्पण करत त्यांना मानवंदना दिली. तबलावादक जाकीर हुसैन यांनी आपल्या खास शैलीत पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करत उपस्थितांची मने जिंकली.               यावेळी महोत्सवाचे अध्यक्ष आणि संचालक डॉ. जब्बार पटेल सचिव रवी गुप्ता, क्रिएटीव्ह डायरेक्टर समर नखाते, पिफ बझारचे समन्वयक श्रीरंग गोडबोले यांबरोबरच अपर्णा सेन (भारत), प्रो. जेर्झी स्टर (पोलंड), गोरान पास्कलजेव्हिक (सर्बिया), जॉर्ज अरियागाडा (चिली), जेन्स फिशर (स्वीडन), गोवरी रामनारायण (भारत), बेनेट रत्नायके (श्रीलंका) आणि नर्गिस अबायर (इराण) आदी मान्यवर उपस्थित होते. पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सवचे दरवर्षी आयोजन केले जाते.