प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा आणि अभिनेत्री मेघा घाडगे (Megha Ghadge) हिने अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. अनेक मराठी चित्रपटांमध्ये मेघा झळकली आहे. 'माहेरची माया', 'परतु', 'चल धर पकड', 'नवरा माझा भवरा', 'चालू द्या तुमचं', 'पोपट' या मराठी सिनेमात ती दिसली आहे. मेघाने नुकतेच एका मुलाखतीत तिला इंडस्ट्रीत तिच्या करिअरवर परिणाम होणाऱ्या घटनेबद्दल सांगितलं.
मेघा घाडगेने नुकतेच आरपार ऑनलाइनला मुलाखत दिली. त्यावेळी ती म्हणाली की, ''मी एका कोरियोग्राफर आणि त्याच्या असिस्टंटला माझ्या घरात आश्रय दिला होता. तो मुलगा माझ्यापेक्षा खूप लहान होता आणि त्यावेळी मी एका रिलेशनशीपमध्ये होती. त्याबद्दल कोणाला सांगितलं नव्हतं. आमच्या टीममधल्या एकाने माझ्या घरात राहणाऱ्या मुलाबद्दल अफवा पसरवली. माझं इंग्रजीचा प्रॉब्लेम आहे. तर त्याने मला विचारलं की, तो तुझा क्रश आहे ना. तर मला वाटलं की तो डान्सबद्दल विचारतो आहे. म्हणून मी म्हटलं हो. कसला नाचतो. अप्रतिम आहे. क्रश शब्दामुळे त्या मुलाने माझे त्या मुलासोबत अफेयर असल्याचं पसरवलं.''
''त्या दोघींना मी कानाखाली मारून जाब का नाही विचारला?''ती पुढे म्हणाली की, ''इथे आपल्या इंडस्ट्रीत दोन अभिनेत्री अशा आहेत, गॉसिप क्वीन असतात ना. त्या ग्रुपवर होत्या. मला आज एकाने विचारलं की मेघाचं काही अफेयर चालू आहे का? त्या मुलाबरोबर. तुला माहिती आहे का काही यातलं?. आणि त्याने ते ग्रुपवर टाकलं होतं. आणि काय काय भसाभस एसएमएस सुरू झाले होते आणि त्या दोघी ज्या क्वीन होत्या त्यांचा काही काहीही काडीचाही संबंध नाही या गोष्टीशी त्या इतक्या बोलायला लागल्या होत्या त्या ग्रुपवर की हिला मारा. हिला हे करा. तिचे कपडेच काढा. काय म्हणजे.. बरं माझे म्हणजे माझ्याकडे त्यांचे इतके गुपित आहेत ना नाही तोंड उघडू शकत माझं. कारण मी नाहीये ती. तो मुलगा वेगळ्याच झोनमध्ये होता. त्यामुळे मी खूप डिप्रेशनमध्ये गेले आणि त्या समोर यायला तयार नाहीत. त्यामुळे या सगळ्याचा परिणाम माझ्या करिअरवर झाला. त्यामुळे मला वाटतं, त्या दोघींना मी कानाखाली मारून जाब का नाही विचारला.''