म्हणून चिराग पाटील निघाला रोड ट्रीपला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2017 12:10 IST
अभिनेता चिराग पाटील सध्या रोड ट्रीप एन्जॉय करतोय. होय, येत्या 10 मार्चला चिराग पाटीलचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने पत्नी ...
म्हणून चिराग पाटील निघाला रोड ट्रीपला
अभिनेता चिराग पाटील सध्या रोड ट्रीप एन्जॉय करतोय. होय, येत्या 10 मार्चला चिराग पाटीलचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने पत्नी सनासह पंधरा दिवसासाठी रोड ट्रिपला निघाला आहे.त्यासाठी तो सध्या शूटिंग करत असलेला 'लव्ह बेटींग' हा सिनेमाच्या शूटिंगमधूनही ब्रेक घेतला आहे. नैनीताल,उदयपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणांना तो सध्या भेट देत आहे.रोज कोणत्या शहराला त्याने भेट दिली?त्या ठिकाणाचे वैशिष्ट्य काय आहे अशा वेगवेगळ्या गोष्टींची माहीती आणि त्याठिकाणाचे खास फोटोही तो सोशल मीडियावर अपलोड करत असतो.त्यामुळे त्याचा हा वाढदिवस त्याने अगदी हटके पद्धतीने सेलिब्रेट करायचे ठरवले असून त्याचे वाढदिवसाचे प्रिसेलिब्रेशन तो एन्जॉय करतोय.चिराग हा क्रिकेटर संदीप पाटील यांचा मुलगा आहे तर चिरागची पत्नी सना ही क्रिकेटर सलील अंकोलाची मुलगी आहे. चिराग आणि सनाचे लव्ह मॅरेज असून त्यांनी अनेक वर्षांच्या नात्यानंतर लग्न केले आहे.चिरागचे नुकतेच 1 डिसेंबर 2016ला लग्न झाले आहे.त्यामुळे लग्नानंतरचा पहिला बर्थ डे सेलिब्रेशन असणार आहे.पत्नी सनासोबत खूपच चांगल्याप्रकारे त्याचा बर्थ डे सेलिब्रेट करायचा असल्यामुळे त्याने आणखी काही खास गोष्टींचेही प्लॅनिंग केले आहे. सनाही चिरागला एक खास बर्थ डे सरप्राईज देणार आहे. त्यामुळे सध्या दोघेही सेलिब्रेशनच्या मुडमध्ये असून मिळालेला निवांत वेळ ते अगदी आनंदात मजा मस्ती करता घालवत आहेत.ही रोड ट्रीप पूर्ण केल्यानंतर चिराग पुन्हा एकदा ‘लव बेटिंग’ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी होणार आहे.