Join us

वजनदार चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2016 14:49 IST

लॅन्डमार्क फिल्म्स निर्मित वजनदार या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. सचिन कुंडलकर दिग्दर्शित या चित्रपटाची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे.

लॅन्डमार्क फिल्म्स निर्मित वजनदार या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. सचिन कुंडलकर दिग्दर्शित या चित्रपटाची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे. कारण या चित्रपटातील अभिनेत्री सई ताम्हणकर आणि प्रिया बापट यांना वजनदार भूमिकेत पाहायला त्यांचे चाहते उत्सुक होते. चित्रपटाच्या ट्रेलरमुळे त्याची एक झलक पाहायला मिळाल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. तसेच या चित्रपटात अभिनेता सिध्दार्थ चांदेकर, चेतन चिटणीस, चिराग पाटील या कलाकारांचा समावेश आहे. ज्या बारीक नसतात त्या जाडच असतात असा सांगणाऱ्या या ट्रेलरने सोशल मीडियावर बरेच लाइक्स मिळवले आहेत. हा चित्रपट 11 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.