Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिंकू राजगुरूची बारावीची मार्कशीट पाहिलीत का?, फोटो होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2023 12:59 IST

Rinku Rajguru : आज रिंकू राजगुरू २१ वा वाढदिवस साजरा करते आहे. चाहत्यांकडून तिच्यावर वाढदिवसांच्या शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या चित्रपटातून मराठी कलाविश्वात पदार्पण करणारी ‘आर्ची’ अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) हे नाव कोणालाही नवीन राहिलेलं नाही. तिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर सिनेइंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहे. आज रिंकू २१ वा वाढदिवस साजरा करते आहे. चाहत्यांकडून तिच्यावर वाढदिवसांच्या शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त आपण तिच्या दहावी बारावीच्या मार्कांबद्दल जाणून घेऊयात.

अभिनेत्री रिंकू राजगुरू हिला दहावीच्या परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील अकलूजमधील शाळेतून ६६.४० टक्के गुण मिळवले होते. मात्र बारावीला जास्त अभ्यास करून तिने यापेक्षा जास्त ८२ टक्के गुण मिळवले आहेत. सोलापूर जवळील टेंभुर्णी येथील जय तुळजाभवानी कला आणि विज्ञान कनिष्ठ आश्रम महाविद्यालयातील परीक्षा केंद्रातून रिंकूने परीक्षा दिली होती. यावेळी तिला पाहण्यासाठी परीक्षा केंद्रावर गर्दी झाली होती. गोंधळ होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे इंग्लिशमध्ये सांगू.. म्हणणाऱ्या आर्चीला बारावीत इंग्रजीत १०० पैकी ५४ गुण मिळाले आहेत.

रिंकू राजगुरूला दहावीत ६६.४० टक्के मार्क मिळाले होते. त्यावेळी ती सैराट चित्रपटाचे शूटिंग सुरू असल्यामुळे तिला शाळेत जाता आले नव्हते. त्यामुळे दहावीच्या परीक्षेत कमी मार्क मिळाल्याचे रिंकूने सांगितले होते. मात्र ही कसर तिने बारावीच्या परीक्षेत भरून काढल्याचे दिसले. आता रिंकू बारावीनंतर पुढील शिक्षण घेते आहे.

वर्कफ्रंट...

रिंकू राजगुरूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तिने सैराटनंतर कागर, मेकअप अशा काही मराठी सिनेमांमध्ये काम केले आहे. तर, ओटीटीवरही तिने पदार्पण केले असून वेबसीरिजमध्येही काम केले आहे. लवकरच ती छुमंतर चित्रपटात झळकणार आहे.

टॅग्स :रिंकू राजगुरू