Join us
Daily Top 2Weekly Top 5

मानसी नाईकचा हा रॉयल अंदाज तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 07:15 IST

मानसीच्या स्टाइल आणि फॅशनची कायमच चर्चा होत असते. विविध सोहळ्याला अनुसरुन आणि त्याला साजेशीच अशी मानसीची स्टाईल असते.

'वाट बघतोय रिक्षावाला' या गाण्यावर थिरकत तमाम रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवणारी अभिनेत्री मानसी नाईक. तिचा प्रत्येक अंदाज रसिकांच्या पसंतीस उतरतो. तिच्या डान्स कौशल्यासोबतच तिच्या मादक अदा आणि ग्लॅमरस लूकच्याही तितक्याच चर्चा होतात.मानसीचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोतील अंदाजही तिच्या फॅन्सना चांगलाच भावतो आहे. या फोटोत मानसीचा रॉयल अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे. ब्लॅक अँड गोल्डन शेड असलेल्या आकर्षक ड्रेसमुळे मानसीच्या सौंदर्याला चारचाँद लावले आहेत. तिच्या या फोटोवर रसिकांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.रिल लाइफप्रमाणे रिअल लाइफमध्येही मानसी तितकीच ग्लॅमरस आणि स्टायलिश आहे. मानसीच्या स्टाइल आणि फॅशनची कायमच चर्चा होत असते. विविध सोहळ्याला अनुसरुन आणि त्याला साजेशीच अशी मानसीची स्टाईल असते.

मानसीनं आपली फॅशन स्टाईल जपली आहे.कायमच आपल्या फॅशन स्टेटमेंटने ती रसिकांवर जादू करत असते. आता पुन्हा एकदा मानसीनं रसिकांवर जादू केली आहे. यावेळी तिनं आपल्या डान्सनं नाही तर आपल्या खास लूकनं रसिकांना आकर्षित केलं आहे. मानसीचे बघतोय रिक्षावाल या गाण्याप्रमाणेच 'बाई वाडयावर या'हे गाणे तुफान हिट ठरले.मानसीच्या प्रत्येक गाण्याने तर पार्टी असो या लग्न हे गाणे धुमाकूळ घालताना पाहायला मिळते. तिचे बघतोय रिक्षावाला या गाण्याची रसिक आजही आनंद लुटताना दिसतात. 

प्रसिद्ध कलादिग्दर्शक, दिग्दर्शक आणि ४ राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आगामी जी लो अपनी फिल्मी ख्वाईशें या सिनेमात मानसी झळकणार आहे. या सिनेमाची खासियत म्हणजे मानसी यांत एक दोन नाही तर तब्बल २८ व्यक्तीरेखा रुपेरी पडद्यावर साकारणार आहे. या व्यक्तीरेखासुद्धा साध्यासुध्या नसून गेली अनेक वर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या बॉलीवुड कलाकारांच्या आहेत. यांत हिंदी चित्रपटसृष्टीच्या अभिनेत्री मधुबाला, ऐश्वर्या राय बच्चन, रेखा यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे मानसी केवळ अभिनेत्रींच्या व्यक्तीरेखा साकारणार नसून बॉलीवुडच्या हिट नायकांच्या व्यक्तीरेखाही ती साकारणार आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन, दबंग सलमान खान, असरानी अशा कलाकारांच्या गाजलेल्या व्यक्तीरेखा मानसी रुपेरी पडद्यावर साकारणार आहे. काही तरी हटके करत बॉलीवुडच्या दिग्गज कलाकारांना ट्रिब्युट देण्याचा नितीन चंद्रकांत देसाई यांचा या सिनेमातून प्रयत्न आहे. या भूमिका साकारण्यासाठी मानसी परफेक्ट होती असे ते म्हणतात. 

टॅग्स :मानसी नाईक