Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रवीण तरडेंच्या पत्नीचे फोटो तुम्ही पाहिले का? दिसते खूपच सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 06:00 IST

प्रवीण यांच्या पत्नीचे नाव स्नेहल असून त्यांनी कानाला खडा या कार्यक्रमात काही वर्षांपूर्वी हजेरी लावली होती. त्यांनी या कार्यक्रमात प्रवीण यांच्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.

ठळक मुद्देप्रवीण तरडे यांच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर आपल्याला त्यांच्या कुटुंबियांचे फोटो देखील पाहायला मिळतात.

राधे हा चित्रपट नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला असून या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटात प्रवीण तरडे यांनी दगडू दादा ही भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्यांची भूमिका पाहून त्यांचे फॅन्स नाराज झाले आहेत. सलमानसोबत चांगले नाते निर्माण करण्यासाठी मी राधे हा चित्रपट स्वीकारला असे प्रवीण यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे.

 प्रवीण तरडे यांना चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून त्यांच्या चाहत्यांना त्यांच्याविषयी जाणून घ्यायची नेहमीच इच्छा असते. प्रवीण देखील त्यांच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर त्यांच्या चाहत्यांना त्यांच्याविषयी अपडेट देत असतात. त्यांना सोशल मीडियावर त्यांचे अनेक चाहते फॉलो करतात.

प्रवीण तरडे यांच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर आपल्याला त्यांच्या कुटुंबियांचे फोटो देखील पाहायला मिळतात. त्यांची पत्नी अतिशय सुंदर दिसत असून त्यांची जोडी त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते.

त्यांच्या पत्नीचे नाव स्नेहल असून त्यांनी कानाला खडा या कार्यक्रमात काही वर्षांपूर्वी हजेरी लावली होती. त्यांनी या कार्यक्रमात प्रवीण यांच्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. त्या म्हणाल्या होत्या की, प्रवीण दिवसभर झोपतात आणि रात्रीच्या वेळी काम करतात. तसेच त्यांच्यासाठी कुटुंबाच्याआधी मित्र येतात. पण त्यांचे फ्रेंड्स आमच्या प्रत्येक संकटात, परिस्थितीत आमच्या पाठिशी उभे असतात.

प्रवीण तरडे एका सामान्य कुटुंबातील असून त्यांचे वडील शेतकरी आहेत तर आई या गृहिणी... मुळशी या तालुक्यात ते लहानाचे मोठे झाले आहेत. मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे याचा मला अभिमान असल्याचे ते आवर्जून सांगतात.

प्रवीण तरडे यांचे शिक्षण पुण्यात झाले असून रंगमंचावर काम केल्यानंतर ते मालिका आणि चित्रपटांकडे वळले. त्यांनी अभिनयक्षेत्रात येण्याआधी नोकरी देखील केली आहे. पण नोकरी करणे आपल्याला जमणारे नाही असे त्यांना वाटत असल्याने त्यांनी ती नोकरी सोडली. करिअरच्या सुरुवातीला प्रवीण तरडे यांनी कुंकू या मालिकेसाठी तब्बल एक हजार भागांचं लिखाण केलं होते आणि ही मालिका सुपरहिट ठरली. त्यानंतर त्यांनी पिंजरा, तुझे माझं जमेना, अनुपमा, असे हे कन्यादान यांसारख्या अनेक प्रसिद्ध मालिकांचं लेखन केले. त्यांनी आज एक अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

टॅग्स :प्रवीण तरडे