Join us
Daily Top 2Weekly Top 5

​स्वप्निल जोशीच्या मुलाचे फोटो तुम्ही पाहिलेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2018 10:37 IST

महाराष्ट्राचा लाडका अभिनेता स्वप्निल जोशीच्या घरी गेल्याच महिन्यात एका चिमुकल्याचे आगमन झाले आहे. स्वप्निल दुसऱ्यांदा डॅडी बनला असून त्याची ...

महाराष्ट्राचा लाडका अभिनेता स्वप्निल जोशीच्या घरी गेल्याच महिन्यात एका चिमुकल्याचे आगमन झाले आहे. स्वप्निल दुसऱ्यांदा डॅडी बनला असून त्याची पत्नी लीनाने ७ डिसेंबरला गोंडस मुलाला जन्म दिला आहे. या बाळाचे बारसे नुकतेच धुमधडाक्यात करण्यात आले. या बाळाचे नाव राघव ठेवण्यात आले असून राघवच्या आगमनाने जोशी कुटुंब सध्या चांगलेच खूश आहे. स्वप्निल त्याच्या चित्रपटांच्या चित्रीकरणात कितीही व्यग्र असला तरी जास्तीत जास्त वेळ राघवला देण्याचा प्रयत्न करत आहे. स्वप्निलने आपल्या हटके अभिनय शैलीने प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. त्यामुळेच प्रेक्षक त्याला महाराष्ट्राचा लाडका अभिनेता म्हणून संबोधतात. दरम्यान, स्वप्निल आणि लिना १६ डिसेंबर २०११ ला लग्नाच्या बंधनात अडकले होते. लिना ही व्यवसायाने डेन्टिस्ट असून, ती मूळची औरंगाबाद येथील आहे. या दाम्पत्याला मायरा नावाची पहिली मुलगी असून, ती आता दीड वर्षाची झाली आहे. या नव्या पाहुण्याच्या आगमनामुळे संपूर्ण जोशी कुटुंब प्रचंड आनंदी झाले आहे. स्वप्निलचा सध्या सगळा वेळ हा केवळ मायरा आणि राघव यांच्यासाठीच आहे.स्वप्निलने ‘उत्तर रामायण’ या मालिकेतून वयाच्या नवव्या वर्षी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्याने ‘कृष्णा’ या मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारून प्रेक्षकांना आपलेसे केले. त्याची ही भूमिका प्रेक्षकांना त्याकाळी प्रचंड पसंतीस आली होती. पुढे ‘हद कर दी आपने’, ‘दिल विल प्यार व्यार’, ‘देस में निकला होगा चाँद’, ‘अमानत’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारून आपल्यातील अभिनयाची चुणूक दाखवून दिली. ‘गुलाम-ए-मुस्तफा’ या चित्रपटात त्याने साकारलेल्या भूमिकेचे तर सर्वत्र कौतुक झाले होते. ‘कॉमेडी सर्कस’ या कार्यक्रमात स्वप्निलचा एक वेगळा पैलू प्रेक्षकांना बघावयास मिळाला. या कार्यक्रमातील त्याच्या कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवले.स्वप्निलला आज मराठीतील सुपरस्टार असे संबोधले जाते. मराठीतील ‘दुनियादारी’, ‘मुंबई-पुणे-मुंबई’, ‘भिकारी’ यांसारखे अनेक हिट चित्रपट त्याने दिले आहेत. सध्या ‘मुंबई-पुणे-मुंबई-३’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात तो व्यस्त आहे. Also Read : आता स्वप्निल जोशीच्या या लाडक्या मित्राचा आणि त्याच्या मुलाचा वाढदिवस असणार एकाच दिवशी