Join us
Daily Top 2Weekly Top 5

​प्रिया बापट आणि स्वप्निल जोशीचा जुना फोटो तुम्ही पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2017 12:44 IST

प्रिया बापट आणि स्वप्निल जोशी यांनी आपल्या अभिनयातून आज मराठी चित्रपटसृष्टीत आपले एक नाव कमावले आहे. केवळ मराठीतच नव्हे ...

प्रिया बापट आणि स्वप्निल जोशी यांनी आपल्या अभिनयातून आज मराठी चित्रपटसृष्टीत आपले एक नाव कमावले आहे. केवळ मराठीतच नव्हे तर या दोघांनी हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. प्रिया आणि स्वप्निल आज मराठी चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारताना आपल्याला दिसतात. त्या दोघांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अधुरी एक कहाणी या मालिकेत एकत्र काम केले होते. ही मालिका त्या काळात चांगलीच गाजली होती. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत. याच मालिकेच्या जुन्या आठवणींना प्रियाने नुकताच उजाळा दिला आहे. प्रियाने अधुरी एक कहाणी या मालिकेतील एक फोटो नुकताच फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटवर पोस्ट केला आहे. या फोटोत आपल्याला प्रिया आणि स्वप्निल हे दोघे दिसत आहेत. हा फोटो प्रियाने पोस्ट करताना लिहिले आहे की, आज आईकडे जुने अल्बम चाळत असताना सापडलेला हा आठवणींचा उजाळा...प्रियाने हा फोटो पोस्ट करताच काहीच तासांत या फोटोला हजाराहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत तर अनेकांनी या फोटोवर प्रतिक्रिया दिल्या आहेत तर प्रिया आणि स्वप्निलच्या अनेक चाहत्यांनी तो फोटो शेअर देखील केला आहे. अधुरी एक कहाणी या मालिकेतील या फोटात प्रिया आणि स्वप्निल खूपच गोड दिसत आहेत. या फोटोच्या कमेंटमध्ये मोहन खामबेटे यांनी या मालिकेचा अजून एक जुना फोटो शेअर केला आहे आणि हा फोटो फिल्मसिटी मध्ये काढला असल्याचे त्यांनी त्यासोबत म्हटले आहे. ते या मालिकेत प्रियाच्या बॉसच्या भूमिकेत दिसले होते. Also Read: ​लहानपणी अशी दिसायची ही अभिनेत्री? आज आहे आघाडीची नायिका