Join us
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही कधी अभिनेत्री श्रुती मराठेच्या नवऱ्याला पाहिलंत का?, सिनेमाच्या सेटवर फुलली त्यांची लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 17:55 IST

अभिनेत्री श्रुती मराठेप्रमाणे तिचा पतीही मराठी कलाविश्वातील एक प्रसिद्ध चेहरा आहे.

सेलिब्रेटींच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहत्यांना नेहमीच आवडतं. तसेच त्यांच्या अफेयर, लव्ह लाइफबद्दल जाणून घ्यायला देखील चाहत्यांना आवडतं. ते कुठे राहतात, त्यांना काय आवडतं त्यांच्या कुटुंबात कोणकोणत असते, हे जाणून घेण्यासाठी चाहते नेहमी उत्सुक असतात. आज आम्ही तुम्हाला अभिनेत्री श्रुती मराठेबाबत सांगणार आहोत.

अनेकांचे जोडीदार हे स्वतःही याच क्षेत्रातले आहेत. अभिनय क्षेत्रात काम करणा-या पती-पत्नी कलाकारांच्या कितीतरी जोड्या आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका जोडीबाबत सांगणार आहोत. ही जोडी आहे प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती मराठे आणि तिच्या पतीची. श्रुतीप्रमाणे तिचा पतीही मराठी कलाविश्वातील एक प्रसिद्ध चेहरा आहे. 

श्रुतीच्या पतीचं नावं  गौरव घाटणेकर आहे. तो सुद्ध अभिनेता आहे.  श्रुती पती गौरवसोबतचे फोटो अनेकवेळा सोशल मीडियावर शेअर करत असते. दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडते. श्रुती आणि गौरवची ओळख 'तुझी माझी लव्ह स्टोरी' या सिनेमाच्या सेटवर झाली होती. या सिनेमाच्या सेटवर दोघांचे सूत जुळले. तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. 

गौरव घाटणेकर मराठी टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील एक नावाजलेले नाव आहे. छोट्या पडद्यावरील ‘तुज विन सख्या रे’ या मालिकेतून गौरव घराघरांत पोहोचला होता. मराठी सिनेमा आणि हिंदी मालिकांबरोबरच हिंदी आणि उर्दू नाटकांतूनही त्याने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

टॅग्स :श्रुती मराठेगौरव घाटणेकर