Join us
Daily Top 2Weekly Top 5

रोहित शेट्टीसोबत काम करायला आली मजा - नेहा महाजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 15:04 IST

नेहा महाजन रोहित शेट्टीचा आगामी चित्रपट 'सिम्बा'मध्ये दिसणार आहे.

ठळक मुद्देनेहा महाजन झळकणार सिम्बा चित्रपटातनेहा महाजनची भूमिका अद्याप गुलदस्त्यात

अभिनेत्री नेहा महाजनने मराठी, तमीळ व इंग्रजी सिनेमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. मराठी चित्रपटसृष्टीत 'कॉफी अॅण्ड बरेच काही', 'निळकंठ मास्तर' व 'वन वे तिकिट' या मराठी सिनेमात नेहाने काम केले आहे. नुकतेच तिने गांव या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आहे. हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाशिवाय नेहा महाजन आणखीन एका हिंदी चित्रपटात झळकणार आहे. ती रोहित शेट्टीचा आगामी चित्रपट सिम्बामध्ये दिसणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्याचे नेहाने सोशल मीडियावर सांगितले. अभिनेत्री नेहा महाजनने दिग्दर्शक रोहित शेट्टीसोबत सिम्बाच्या सेटवरील फोटो शेअर करून लिहिले की, रोहित शेट्टीसोबत काम करायला खूप मजा आली. 'सिम्बा'चे चित्रीकरण पार पडले आहे. 

'सिम्बा' या सिनेमात नेहा महाजनसोबत विजय पाटकर, सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले आदी मराठी कलाकारांच्या भूमिका आहेत. या सिनेमात रणवीर सिंग संग्राम भालेराव ही मराठी व्यक्तीरेखा साकारत आहे. या सिनेमातील 'मी इंस्पेक्टर संग्राम भालेराव. जो देतो त्रास, त्याचा मी घेतो घास' हा संवाद सध्या चांगलाच धुमाकूळ घालत आहे. याआधीदेखील रोहित शेट्टीच्या 'सिंघम' आणि 'सिंघम रिटर्न'मध्ये मराठी कलाकार झळकले होते. रोहित शेट्टी 'स्कूल कॉलेज आणि लाईफ' या मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहे. नेहा महाजन सिम्बामध्ये कोणत्या भूमिकेत दिसणार आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र तिचे चाहते तिला 'सिम्बा'मध्ये पाहण्यास उत्सुक आहेत.

टॅग्स :नेहा महाजनरोहित शेट्टी