सखीचा हॉट लूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2016 12:42 IST
Exculsive - बेनझीर जमादारदिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री सखी गोखले हिचे सध्या सोशलमिडीयावर ...
सखीचा हॉट लूक
Exculsive - बेनझीर जमादारदिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री सखी गोखले हिचे सध्या सोशलमिडीयावर हटके व हॉट फोटो व्हायरल होत आहे. सखी दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेत अगदीच सोज्वळ भूमिकेत दिसली होती. तसेच तिचे सलवार कमीजमधला लूक प्रेक्षकांनी पाहिला होता. पण तिचे सोशलमिडीयावर व्हायरल झालेले हॉट फोटो पाहून तिचे चाहते देखील अवाक होतील. सखीने नुकतेच हे फोटोशुट केले आहे. तिची सुंदर अशी छबी फोटोग्राफर विनायक कुलकर्णी यांनी कॅ मेरात कैद केली आहे. या किल्कमध्ये मात्र सखी एकदमच झककास दिसत आहे. तिने ब्लॅक कलरचा जो कॉश्च्युम परिधान केला आहे. तसेच या कॉश्चुमबरोबर तिची ही अदा देखील नक्कीच तिच्या चाहत्यांना घायाळ करेल.