Join us

सिद्धार्थ जाधवच्या लेकीने दिल्या होळीच्या गोड शुभेच्छा....!, पहा हा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 17:10 IST

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधवने आपल्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधवने आपल्या विनोदी शैलीतून रसिकांना चांगलीच भुरळ पाडली आहे. त्यात रणवीर सिंग अभिनीत सिम्बा चित्रपटात सिद्धार्थने साकारलेल्या पोलिसाच्या भूमिकेने देखील प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. सिद्धार्थ सध्या सोशल मीडियावर सक्रीय असतो. या माध्यमातून तो आपल्या चाहत्यांना त्याची अपडेट देत असतो. नुकतेच त्याने आपल्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा शुभेच्छांचा व्हिडिओमध्ये त्याची लेक इरादेखील आहे. 

सिद्धार्थने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तो त्याची लेक इरासोबत आपल्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा देत आहे.

इराच्या बोबड्या आवाजातील शुभेच्छा ऐकून त्याचे चाहते खूश झाले आहेत आणि तेदेखील त्या दोघांना होळीच्या शुभेच्छा देत आहेत. या व्हिडिओसोबत सिद्धार्थने हॅप्पी होळी असे म्हणत बापलेकीची  मज्जा असे देखील सांगितले आहे.

टॅग्स :सिद्धार्थ जाधवहोळी 2023