मालिकेतून सर्वांच्या घरांत, मनात आपली जागा निर्माण करणारी जान्हवी उर्फ अभिनेत्री तेजश्री प्रधान हिचा आज वाढदिवस. मराठी चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये आणि नाटकात पण तेजश्रीने काम केले आहे. झेंडा, शर्यत, लग्न पाहावे करुन आणि डॉ. प्रकाश बाबा आमटे- दि रिअल हिरो या चित्रपटात तेजश्रीने काम केले आहे तर प्रशांत दामले यांच्यासोबत ‘कार्टी काळजात घुसली’ या नाटकात काम करत आहे. ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेतून तेजश्रीचं जान्हवी हे पात्र लोकप्रिय ठरलं. या मालिके अगोदर तिने घर तुझे नि माझे घर श्रीमंताचे, लेक लाडकी या घरची या मालिकेत काम केले आहे.
तेजश्री आता बॉलिवूड अभिनेता शर्मन जोशीसोबत ‘मैं और तुम’ या हिंदी नाटकात काम करत आहे.