‘अग्निहोत्र’ मालिकेतील निल उर्फ सिध्दार्थ चांदेकरचा आज वाढदिवस. अग्निहोत्र ही सिध्दार्थची पहिली मालिका आहे. त्यानंतर त्याने अवधूत गुप्ते दिग्दर्शित झेंडा चित्रपटात काम केले. बालगंधर्व, सतरंगी रे, जय जय महाराष्ट्र माझा, संशय कल्लोळ, लग्न पाहावे करुन, दुसरी गोष्ट, बावरे प्रेम हे, क्लासमेट्स, ऑनलाईन बिनलाईन आदी या चित्रपटात सिध्दार्थने काम केले. अग्निहोत्र मालिकेसह सिध्दार्थने इतर मालिका पण केल्या. जसे की कशाला उद्याची बात आणि मधू इथे आणि चंद्र तिथे.
सिध्दार्थ चांदेकर आता पिंडदान आणि लॉस्ट अँड फाऊंड या दोन चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करायला येणार आहे.
अभिनेता सिध्दार्थ चांदेकरला वाढदिवसाच्या आणि त्याच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!