Join us

रिंकू राजगुरुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2016 13:19 IST

सैराटमधल्या बिनधास्त आर्चीला आता भारतभर सगळेच ओळखतात... तिची वेगळी ओळख करुन द्यायची आता गरज वाटत नाही. आर्ची नावानेच रिंकू ...

सैराटमधल्या बिनधास्त आर्चीला आता भारतभर सगळेच ओळखतात... तिची वेगळी ओळख करुन द्यायची आता गरज वाटत नाही. आर्ची नावानेच रिंकू राजगुरुला ओळखले जाते. आज आर्ची उर्फ रिंकू राजगुरुचा वाढदिवस आहे. आज या बिनधास्त मुलीला १५ वर्ष पूर्ण झाली. वयाच्या १५ व्या वर्षी रिंकूने चित्रपटसृष्टीत अभिनयाने स्वत:चं नाव तयार केलं. राष्ट्रीय पुरस्कार मिळवून रिंकूने यशाची पहिली पायरी चढली. असंच यश रिंकूला पुढे मिळत राहो. अभिनेत्री रिंकू राजगुरुला वाढदिवसाच्या आणि पुढील वाटचालीकरता हार्दिक शुभेच्छा!!