नुकतंच ‘एक अलबेला’ या चित्रपटात ‘अलबेला भगवान दादां’ची भूमिका साकारणारा अभिनेता मंगेश देसाईंचा आज वाढदिवस. मंगेश देसाई हे अभिनेता म्हणून तर प्रसिध्द आहेच पण ते साऊंड डिझायनर म्हणून पण प्रसिध्द आहेत. खामोश, युध, लैला, शोले, झंझीर, पाकीझाह, बॉबी, नवरंग आदी चित्रपटाचं साऊंड डिझायनर म्हणून त्यांनी काम सांभाळलं आहे. तर सिंड्रेला, बायोस्कोप, ब्लफमास्टर, मी आणि यु, अशाच एका बेटावर, हुप्पा हुय्या, खेळ मांडला या चित्रपटात त्यांनी अभिनय केला आहे.
नुकताच त्यांचा ‘एक अलबेला’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. ‘लॉस्ट अँड फाऊंड’ हा त्यांचा आगामी चित्रपट आहे.
अभिनेते मंगेश देसाई यांना वाढदिवसाच्या आणि त्यांच्या पुढील वाटचालीकरता हार्दिक शुभेच्छा!