झी मराठी वाहिनीवरील ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमात फायनल पर्यंत पोहचलेली गोंडस गायिका आर्या आंबेकरचा आज वाढदिवस.
शास्त्रीय संगीत, नाट्यगीते, भावगीते, भक्तिगीते, लावणी, लोकगीते तसेच हिंदी गाणी पण आर्या ताकदीने गाते.
नुकतंच तिचं ‘अलवार माझे मन’ हे गाणं प्रदर्शित झालं आणि या गाण्यातून मोठी आर्या पण प्रेक्षकांना पाहायला मिळाली.
आर्या आंबेकरच्या वाढदिवसानिमित्त आर्याच्या आवाजाची जादू अनूभवा तिच्या नवीन गाण्यातून- ऐका, शेअर करा आणि आपल्या आर्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या.