Join us

गुलाबाची कळी तेजस्विनी पंडीतला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2016 16:21 IST

गुलाबाची कळी तेजस्विनी पंडीत ही मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द आणि सर्वांची लाडकी अभिनेत्री आहे. आज गुलाबाच्या कळीचा वाढदिवस आहे. सगळ्याच ...

गुलाबाची कळी तेजस्विनी पंडीत ही मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द आणि सर्वांची लाडकी अभिनेत्री आहे. आज गुलाबाच्या कळीचा वाढदिवस आहे. सगळ्याच चाहत्यांनी तेजस्विनीला शुभेच्छा दिल्या असणार. मराठी चित्रपट आणि मालिकांमधून तेजस्विनीने आपली ओळख निर्माण केली. अगं बाई अरेच्या या चित्रपटात खलनायिकेची भूमिका तेजस्विनीने केली होती. तसेच गैर, रानभूल, मी सिंधूताई सपकाळ, एक तारा, टार्गेट, ब्लफमास्टर, तू हि रे आदी चित्रपटांत महत्त्वाची भूमिका साकारली होती. तुझं नि माझं घर श्रीमंताचं, कालायं तस्मै नम:, एकाच या जन्मी जनू मालिकांत काम केले आणि कॉमेडीची बुलेट ट्रेन या शोचा अँकरिंग पण तेजस्विनीने केले आहे.