ग्रेटेस्ट ख्रिसमस साँग
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 13:57 IST
पारंपरिक, लोकसंगीताची खासियत म्हणजे त्यांचे अस्तित्व पीढी दर पीढी अविरत टिकून असते. त्यामुळेच तर दोनशे वर्षांनंतरही 'सायलेंट नाईट' हे ...
ग्रेटेस्ट ख्रिसमस साँग
पारंपरिक, लोकसंगीताची खासियत म्हणजे त्यांचे अस्तित्व पीढी दर पीढी अविरत टिकून असते. त्यामुळेच तर दोनशे वर्षांनंतरही 'सायलेंट नाईट' हे ख्रिसमस साँग अजून टिकून आहे. 1818 मध्ये ख्रिसमसच्या पूर्व सायंकाळी सर्वप्रथम हे गाणे ऑस्ट्रिया येथे एका छोट्याशा खेड्यातील चर्चमध्ये गाण्यात आले. त्याच्या दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 1816 मध्ये जोसेफ मोहर यांनी शब्द रचले होते. मोहर यांनी त्यांचा संगीतकार मित्र फ्रॅन्झ झेवर ग्रुबेर याला या कवितेला चाल देण्याचे सुचविले. त्यांनतर 24 डिसेंबर 1818 रोजी ओबेरनडॉर्फ चर्चमध्ये त्या दोघांनी हे गाणे सर्वप्रथम गायिले. आजतयागत जपानी, वेल्श, फारसी अशा तीनशे पेक्षा अधिक भाषांमध्ये या गाण्याचे भाषांतर झाले आहे