‘९व्या गोवा मराठी फिल्म फेस्टिव्हल’मध्ये ४ जून रोजी कला अकादमी येथे आणि ५ जून रोजी आयनॉक्स येथे नितीन चव्हाण दिग्दर्शित ‘दमलेल्या बाबाची कहानी’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगचं आयोजन करण्यात आले होते.
पालवी क्रिएशन्स प्रस्तुत, विशाल धनवडे आणि नितीन चव्हाण निर्मित ‘दमलेल्या बाबाची कहानी’ हा चित्रपट वडील आणि मुलीच्या नात्यावर भाष्य करतो. हा चित्रपट पाहून गोवेकर भावूक झाले होते. या चित्रपटाने भावनिकदृष्ट्या प्रेक्षकांचं मन जिंकलं.
याविषयी दिग्दर्शक नितीन चव्हाण सांगतात, “हा चित्रपट पाहून प्रेक्षक सिनेगृहातून अक्षरश: भावूक होऊन निघत होते. एक आजी रडत माझ्याकडे आली आणि म्हणाली की हा चित्रपट वास्तवदर्शी आहे. असे चित्रपट यायला हवेत. तसेच गोव्यात पण हा चित्रपट प्रदर्शित व्हावा अशी मागणी गोवेकरांनी केली.”
वडील-मुलीच्या नात्याचे सुंदर दृश्य गीतकार संदिप खरे आणि अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांच्या अभिनयातून दिसणार आहे. तसेच आस्ताद काळे, ज्योती चांदेकर, दीप्ती भागवत आणि प्रवीण तरडे या कलाकारांचा पण या चित्रपटात अभिनय आहे.