Join us
Daily Top 2Weekly Top 5

Good News! गायिका सावनी रवींद्रच्या घरात लवकरच येणार छोटा पाहुणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 18:56 IST

गायिका सावनी रवींद्रने नुकतीच सोशल मिडीयाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त गायिका सावनी रवींद्रने नुकतीच सोशल मिडीयाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. तिने पती डॉ. आशिष धांडे यांच्यासोबतचे फोटो शेअर करत ती लवकरच आई होणार असल्याची खुशखबर दिली आहे. तिच्या घरी चिमुकला पाहुणा येणार आहे. नुकताच सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून राष्ट्रीय पुरस्कार आणि आता ही गोड बातमी त्यामुळे तिच्या चाहत्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे.

सावनी रवींद्रने या गोड भावना व्यक्त करताना सांगते, ‘’माझ्या मनात सध्या खूप अलौकीक भावना आहेत. ज्या मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. आजवर मी गायिका म्हणून आईपणावर वेगवेगळ्या धाटणीची गाणी गायली आहेत. अंगाईगीत, डोहाळ जेवणाचे गीत, बारश्याची गाणी मी या आधी गायली होती. पण आता मी स्वत: त्या भूमिकेत जाणारं आहे. त्यामुळे आईपण अनुभवण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. मला अस वाटतं की प्रत्येक स्त्री ही भाग्यवान असते. कारण ती आई होऊ शकते. आईपण काय असतं हे फक्त एक आईच जाणू शकते. आणि सध्या मी मातृत्वाच्या उंबरठ्यावर आहे. आणि या फेजचा मी पुरेपुरं आनंद घेत आहे.’’

पुढे ती सांगते, ‘’माझं बाळ माझ्यासाठी लकी चार्म आहे. कारण माझं बाळ पोटात असताना मला माझ्या आयुष्यातील इतका मोठा प्रतिष्ठीत राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तसेच गेल्या सहा महिन्यात मी गरोदरपणात अनेक वेगवेगळे म्युझीक अल्बम, नविन गाणी, काही प्रोजेक्टस शूट केलेत. त्यातील बरीचशी गाणी रिलीज झाली. काही गाणी लवकरच रिलीज होतील. मला खूप अभिमान आहे की माझ्या होणा-या बाळाने मला त्या परिस्थितीत अजिबात त्रास दिलेला नाही. आता मी माझ्या बाळाच्या स्वागतासाठी फारचं उत्सुक आहे.’’

टॅग्स :सावनी रविंद्रराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2018