Join us
Daily Top 2Weekly Top 5

'गोदावरीला' मिळाला राष्ट्रीय पुरस्कार, निखिल महाजन म्हणाले - "खऱ्या अर्थाने एक वर्तुळ पूर्ण झाले..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 13:22 IST

६९ व्या राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा झाली असून गोदावरी या पुरस्कार विजत्या चित्रपटासाठी निखिल महाजन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार घोषित करण्यात झाला आहे.

६९ व्या राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा झाली असून गोदावरी या पुरस्कार विजत्या चित्रपटासाठी निखिल महाजन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार घोषित करण्यात झाला आहे. अभिनेता जितेंद्र जोशीच्या ‘गोदावरी’ चित्रपटाला यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. ‘गोदावरी’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी पुरस्कार देण्यात आला आहे. जितेंद्र जोशी मुख्य भूमिकेत असलेल्या ‘गोदावरी’ चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल महाजन यांनी केलं आहे.

मीडिया बिझनेस, RILच्या अध्यक्षा ज्योती देशपांडे , अशा म्हणाल्या की, आजचा हा पुरस्कार म्हणजे निखील महाजन मधील प्रतिभावान शैली , समर्पण आणि कष्टाची पोचपावती म्हणण्यास हरकत नाही. हे यश मराठी सिनेमा आणि त्याच्या वैविध्यपूर्ण कथाकथनाच्या जोपासना करण्याच्या आमच्या वचनबद्धतेला खोलवर प्रतिध्वनित करते.

ही एक वास्तविक भावना आहे

दिग्दर्शक निखील महाजन म्हणाले की,"कदाचित माझ्या हृदयाच्या सर्वात जवळ असलेल्या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळाला ही एक वास्तविक भावना आहे.  हा पुरस्कार माझ्या आई आणि बाबांसाठी आहे ज्यांनी मला माझे स्वप्न पूर्ण करता यावे यासाठी अथक प्रयत्न केले.  माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या पाठीशी उभे राहिलेले जितेंद्र जोशी यांच्यासाठी आहे,  हा माझ्या संपूर्ण कलाकार आणि गोदावरीच्या क्रूसाठी आहे ज्यांनी येणाऱ्या कोणत्याही संकटांवर एखाद्या चॅम्पियन्ससारखं मात करत एकत्र येवून हा सिनेमा घडवून आणला, हा पराक्रमी गोदावरी आपल्या हृदयात धारण केलेल्या नाशिकसाठी आहे.

ते पुढे म्हणाले की, हा माझे चित्रपट निर्माते जिओ स्टुडिओजसाठी आहे ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून माझा आवाज आणि दूरदृष्टी सर्वत्र पसरवली.  हा पुरस्कार विक्रम गोखले यांच्यासाठी आहे ज्यांनी शूटिंगच्या पहिल्या दिवशी मी हे जिंकेन असे सांगितले होते, आणी शेवटी हा पुरस्कार ज्याच्यासाठी मी गोदावरी बनवला अशा दिग्दर्शक निशिकांत कामत साठी आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळणे म्हणजे खऱ्या अर्थाने एक वर्तुळ पूर्ण करणे होय.

टॅग्स :राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2018