Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुंदरा मनामध्ये भरली..!, नेहा पेंडसेने साडीत केले ग्लॅमरस फोटोशूट, पहा हा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 12:20 IST

नेहा पेंडसे 'भाभीजी घर पर है' मालिकेत सौम्या टंडनच्या जागी पहायला मिळते आहे.

सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे नेहा पेंडसेने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. नेहा सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. आपल्या खासगी आणि सिनेमा तसेच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते. नुकतेच तिने साडीत फोटोशूट केले आहे. या फोटोशूटच्या वेळचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे.

नेहा पेंडसे हिने नुकतेच इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती साडीत फोटोशूट करताना दिसते आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिले की, देवाच्या कृपेने मी अशी आहे.

गेल्या ५ वर्षांपासून सौम्या टंडन भाभीजी घर पर है या मालिकेत काम करत होती. तिने अनिता भाभीची भूमिका लोकप्रिय केली होती. खाजगी कारणांमुळे काही दिवसांपूर्वीच सौम्याने ही मालिका सोडली होती, त्यानंतर तिची जागा नेहा पेंडसेने घेतली होती. अलीकडेच या शोचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे ज्यामध्ये नेहा एका नवीन लूकमध्ये दिसली आहे. नेहाचा हा लूक खूपच जबरदस्त आहे. आपल्या अदांनी तिने या भूमिकेला चार चांद लावले आहेत.

शोचा हा नवीन प्रोमो नेहाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती अगदी वेगळ्या आणि स्टाईलमध्ये दिसते आहे. यामध्ये नेहाने लाल रंगाची साडी परिधान केली आहे. व्हिडिओ शेअर करताना नेहाने लिहिले की, “कारण भाभीजी आता घरी आहे” मला ही भूमिका दिल्याबद्दल कोहलीचे धन्यवाद, मनोज जी माझी सपोर्ट सिस्टम आहेत. या रोलर कोस्टर राइडमध्ये मजा करण्यास मी तयार आहे.

अभिनेत्री नेहा पेंडसे मराठी आणि हिंदी दोनही ठिकाणी काम केले आहे. 'बिग बॉस12' मध्ये ही नेहा दिसली होती. मराठी आणि हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे.

टॅग्स :नेहा पेंडसेभाभीजी घर पर है