Join us

गिरीश कुलकर्णी काबीलमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2016 15:59 IST

मराठी इंडस्ट्रीट आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता गिरीश कुलकर्णी एका पाठोपाठ एक बिगबजेट बॉलीवुड चित्रपटात झळकणार  आहे. ...

मराठी इंडस्ट्रीट आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता गिरीश कुलकर्णी एका पाठोपाठ एक बिगबजेट बॉलीवुड चित्रपटात झळकणार  आहे. आमिरच्या दंगलपाठोपाठ आता गिरीश ऋतिक रोशन आणि यामी गौतमीसोबत काबिल या चित्रपटात झळकणार आहे. नुकतेच गिरीश हे जाउ द्या ना बाळासाहेब या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनातही पदार्पण करत आहे. काबिल या चित्रपटात गिरीश नकारात्मक भूमिकेत पाहायला मिळणार आहे. संजय गुप्ता दिग्दर्शित काबिल हा चित्रपट २६ जानेवारी २०१७ मध्ये प्रदर्शित होणार आहे. बॉलीवुडमध्ये आमिर व ऋतिकसोबत एकापाठोपाठ एक-चित्रपट करणारा अभिनेता गिरीश कुलकर्णीच्या करिअरला चार चॉंद लागले आहे हे नक्की.